Operation Manomilan will be conducted by Beed city police station

ताज्या बातम्या

बीड शहर पोलीस स्टेशन राबवणार ऑपरेशन मनोमिलन

By admin

May 18, 2024

Operation Manomilan will be conducted by Beed city police station बीड शहर पोलीस ठाणे येथे शांतता कमिटीचे बैठक झाली.  या बैठकीमध्ये संपूर्ण भागामध्ये वाढत असलेला जातीवाद आणि त्यातून सामाजिक विद्वेष यावर काय उपाययोजना करायला पाहिजे यासंदर्भात चर्चा झाली.

यातून बैठकीमध्ये खालील निर्णय घेण्यात आले. सोशल मीडियावर दुसऱ्या जाती बद्दल जो आक्षेपार्य मजकूर लिहिल,  त्याची माहिती पोलिसांना दिली जाईल आणि पोलिसांनी त्यावर कारवाई करावी.  तसेच मनोमिलनासाठी काम करणाऱ्या नागरिकांना पोलिसांनी बक्षीस द्यावे, प्रोत्साहित करावे. दुसऱ्या जाती बद्दल वाईट वक्तव्य जो कोणी करत आहे, त्यांना फोन करून, प्रत्यक्ष भेटून समज देण्याची सर्वांनी भूमिका ठेवावी.

मोठी कीर्तनकार, साधू संत, जातीतील प्रतिष्ठित लोक, डॉक्टर प्राध्यापक, शिक्षक, मोठे अधिकारी, राजकीय व्यक्ती यांना सोशल मीडियावर जातीवाद हा वाईट आहे, समाजासाठी घातक आहे आणि कोणीही दुसऱ्या जातीवर सोशल मीडिया यातून किंवा प्रत्यक्ष चिखल फेक करू नये अशा आशयाचे संवाद प्रसारित करण्यासाठी प्रोत्साहन देण्यात यावे. सोशल मीडियावर येणाऱ्या वाईट पोस्ट या डिलीट करण्यात याव्यात.  गावोगाव गाव भेटी देण्यात याव्या आणि गाव भेटीतून तरुणांना विषारी आणि विद्वेषक जातीवाद हा समाजाला कसा घातक आहे पुढील येणाऱ्या आणि चालू पिढींना तो किती धोकादायक आहे हे पटवून देण्यात यावे.

जास्तीत जास्त वाईट पोस्ट या रात्री उशिराने येत असून,  बरेच लोक नशेमध्ये वाईट पोस्ट करतात.  अशा पोस्ट कडे लोकांनी दुर्लक्ष करावे आणि अशा पोस्ट करणाऱ्यांना चव्हाट्यावर आणावे त्याला समज द्यावी. ग्रुप ॲडमिन ने लक्ष ठेवावे आणि त्याच्या अप्रोहल शिवाय कोणीही पोस्ट टाकणार नाही अशी सेटिंग ग्रूप ल करून घ्यावी. प्रत्येक जातीतील लोकांनी आपल्या जातीतील मोठ्या नेत्यावर जातीय विद्वेष तयार, हिनवणारी भावना तयार होईल अशी वक्तव्य करू नये. यासाठी मनधरणी करावी. असे मुद्दे सर्व स्तरातून सर्व सदस्याकडून मांडण्यात आले आणि त्यावरअशा प्रकारची कार्यक्रम राबवून सर्वांनी ऑपरेशन मनोमिलन याची अंमलबजावणी करण्यासाठी वरील मुद्द्यावर काम करावे यासाठी एक मत झाले.