onion price

ताज्या बातम्या

कांद्याचा झाला वांधा !मिळाला एक रुपया

By admin

March 01, 2023

 

 

onion price कांद्याने मात्र शेतकऱ्यांची चांगलेच वांधे केले आहे.त्यामुळे कांदा हा चक्क कवडीमोल भावाने विकला जात आहे.बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील भावी येथील एका शेतकऱ्यांनी आपला कांदा विकला तर त्यातून त्याला चक्क एक रुपयाची कमाई झाली.

काय आहे हा प्रकार?

गेल्या आठ दिवसापासून कांद्याचे onion rate today भाव कोसळत आहेत. त्यामुळे विक्रीस आलेला कांदा शेतकऱ्यांनी बाजारात न्यावा की नाही हा प्रश्न शेतकऱ्यांसमोर पडतोय. बावी येथील शेतकरी नामदेव लटपटे यांनी आपल्या सतरा  कांद्याचे गोण्या टेम्पो भरून अहमदनगर येथील नेप्तीच्या  कांदा मार्केटमध्ये विकायला घेऊन गेले.

Read more : ह्या रेल्वेत केला मोठा बदल 

त्यांनी आपला कांदा संतोष लहानू सूर्यवंशी या आडत व्यापाऱ्याकडे विकला. एकूण 17 गोणे असलेला हा कांदा एकूण 844 किलो होता.या कांद्याला या  कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये दोन रुपये  onion rate, प्रति किलो प्रमाणे भाव मिळाला.त्याची एकूण पट्टी 1688 रुपये इतकी झाली. तर भाडे चौदाशे 61 रुपये इतकी लागले. त्यामध्ये त्यांनी 221 रुपये उचल  होती.आणि पाच रुपये इतर खर्च याप्रमाणे त्यांना मिळालेल्या एकूण कांद्याच्या रकमेतून खर्च वजा जाता त्यांना व्यापाऱ्याने चक्क एक रुपयाची पावती दिली.

याप्रकाराने नामदेव लटपटे संतप्तत झाले. त्यांनी आपल्या शेतातील वीस गुंठे शेतात कांदा लावला होता पंचगंगा या कांद्याची लागवड त्यांनी केली होती. त्यासाठी त्यांना 18000 रुपये खर्च्च आला होता. साधारणतः दहा किलो बियाण्याचे लागवड त्यांनी शेतात केली होती.

कांद्याचे चांगले उत्पन्न येईल या आशेवर त्यांनी हा कांदा अहमदनगरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये विकला.मात्र प्रत्यक्षात त्यांना फायदा होण्याच्या ऐवजी कांदाच मातीमोल भावाने विकला गेला.याबाबत त्यांच्या पत्नी मनीषा नामदेव लटपटे यांनी तर चक्क हा एक रुपया मुख्यमंत्री यांना पाठवणार असल्याचे सांगितले. मात्र त्यासाठीही दहा रुपये खर्च येत onion market rate today  असल्यामुळे त्यांनी एक रुपया हा घरातच ठेवण्याचा निर्णय घेतला.

गेल्या अनेक दिवसापासून कांद्याला मिळत असलेला हा निश्चांकी भाव शेतकऱ्यांना परवडणारा नाही. त्यामुळे शेतकरी संतप्त झाला आहे.

बीड जिल्ह्यातील बावी या गावांमध्ये शेतकऱ्यांनी कांदा लागवड मोठ्या प्रमाणात केली आहे.त्यामुळे या भागातील शेतकरी आता हवालदिल झाले आहेत.kanda price today   असाच काहीसा अनुभव या गावातील इतर कांदा उत्पादक शेतकऱ्यांनाही आला आहे. त्यामुळे भविष्यात कांदा पिकवायचा की नाही हा मोठा प्रश्न निर्माण झाला.

शेतकऱ्यांची होत असलेले कांद्याचे वांधे सरकारने दूर करण्याची मागणी आता शेतकऱ्यांमधूनव्यक्त होत आहे.

 

,,