ताज्या बातम्या

आषाढी वारी निमित्त पंढरपूर येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते विठ्ठलाची शासकीय महापूजा संपन्न

By admin

July 17, 2024

विठ्ठला…शेतकरी, वारकरी, कष्टकर्यासह राज्यातल्या प्रत्येक घटकाला सुखी समृद्ध कर…..

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची पांडुरंगा चरणी प्रार्थना

Pandharpur

यंदा राज्यातील अनेक भागात पाऊस चांगला पडला आहे. त्यामुळे खरीपाच्या पेरण्या मोठ्या प्रमाणात झाल्या आहेत. यंदा दुबार पेरणीचे संकट नाही.शेतकऱ्यांना वीज बिल माफ करण्यात येणार आहे. त्यामुळे विठ्ठला बळीराजाला सुखी कर, बळीराजाचे संकट दूर कर, चांगली पिके येऊ दे, शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये सोन्याचे दिवस येऊ दे,शेतकरी वारकरी कष्टकरी यांच्यासह राज्यातल्या प्रत्येक वर्गाला सुख समृद्धी लाभू दे असे साकडे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंढरीच्या पांडुरंगा चरणी घातले.

गुरुवारी पहाटे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व त्यांच्या पत्नी लताताई शिंदे हस्ते श्री विठ्ठलाची शासकीय महापूजा पार पडली यंदा शासकीय महापूजेचा लाभ मु. अंबासन तालुका सटाणा जिल्हा नाशिक येथील मानाचे वारकरी बाळू शंकर अहिरे व त्यांच्या पत्नी आशाबाई बाळू अहिरे यांना मिळाला हे दाम्पत्य गेल्या सोळा वर्षापासून पांडुरंगाची नित्यनेमाने वारी करत आहे त्यांचाही मुख्यमंत्र्याच्या हस्ते सन्मान करण्यात आला

यावेळी मुख्यमंत्री शिंदे म्हणालेगेल्या दोन वर्षांपूर्वी अनेक प्रकल्प सुरू केले कल्याणकारी योजना सुरू केल्या.मंदिराचं जतन संवर्धन करून मूळ रूपात मंदिर आणण्यासाठी शासनाकडून 73 कोटीचा निधी मंजूर केला आहे.वारकरी भाविकांना दर्शनाचा त्रास होऊ नये यासाठी शासकीय महापूजा सुरू असताना देखील मुखदर्शन सुरू ठेवण्यात आले होते. व्हीआयपी लोकांपेक्षा सर्वसामान्यांना दर्शनासाठी पहिल्यांदा प्राधान्य मिळावे असा आपला अट्टाहास असल्याचे मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. प्रशासनाकडून वारकरी भाविकांना चांगल्या सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत.आषाढी सोहळ्यासाठी लखो वारकरी भावीक येतात वारकरी भाविकांची गैरसोय होऊ नये यासाठी स्वच्छता पिण्याचे पाणी आरोग्य केंद्र आवश्यक नियोजन आतापर्यंत आरोग्य शिबिराच्या माध्यमातून आठ लाख लोकांनी आरोग्याची तपासणी केली.मुख्यमंत्री असताना पांडुरंगाच्या मंदिरात अनेक कामे करण्यात आली. स्थानिक लोकांना विश्वासात घेऊन विकास आराखडा करत आहोत. दर्शन रांगेत मोठ्या प्रमाणात भाविक उभे राहत असतात त्यांना दर्शन रांगेत जास्त उभा राहता येऊ नये यासाठी त्यांना टोकन पद्धतीने दर्शन व्यवस्था सुरू करण्या साठी 103 कोटीचा निधी दिला आहे. पांडुरंग सर्वसामान्यांचा परमेश्वर आहे सरकार देखील सर्वसामान्यांचे आहे. पंढरपुरात लाखो वारकरी भाविक येतात त्यांच्या आरोग्य सुविधेसाठी 1000 बेडचे हॉस्पिटल मंजूर करण्यात येत आहे.राज्यातील सर्व भाविकांना आषाढीच्या खूप खूप शुभेच्छा या वेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी दिल्या. यावेळी केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा पालकमंत्री चंद्रकांत पाटील, महसूल मंत्री राधकृष्ण विखे पाटील, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, आरोग्य मंत्री डॉ तानाजी सावंत, कामगार कल्याण मंत्री सुरेश खाडे, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, खासदार श्रीकांत शिंदे, खासदार नरेश मस्के माजी मंत्री बबनराव पाचपुते आमदार समाधान आवतडे, आमदार सचिन कल्याण शेट्टी, आमदार भरत गोगावले, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, मंदिर समितीचे सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर, कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके आदी उपस्थित होते.

यावेळी मानाच्या पालख्यांना मुख्यमंत्री व प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले

संत तुकाराम महाराज वंशज देहूकर दिंडी श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळाप्रथम क्रमांक 1 लाख. दाने वाला निकम दिंडी श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळाद्वितीय 75000 तर श्री गुरु बाबासाहेब आजरेकर दिंडी श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा50000 रुपयाचे निर्मल दिंडीचे पुरस्कार मिळाले.