ताज्या बातम्या

उद्यापासून जिल्ह्यातील सर्व शाळा बंद राहणार

By admin

March 19, 2023

जिल्हा शिक्षक संघटना समन्वय समितीचा निर्णय.

बीड

 

old pension scheme strike सर्वांना जुनी पेंन्शन, तीन लाभांची आश्वासीत प्रगती योजना लागू करावी, रिक्त पदे तात्काळ भरावीत,  शिक्षणाचे खाजगीकरण रोखावे या इतर मागण्यांसाठी सुरू असलेल्या बेमुदत संपात सोमवार पासून सर्व शिक्षक, प्राध्यापक आणि शिक्षकेतर कर्मचा-यांनी सहभागी होण्याचा निर्णय घेतला असून सोमवार म्हणजे उद्या पासून संप मिटे पर्यंत   बीड जिल्ह्यातील सर्व शाळा कनिष्ठ महाविद्यालये बंद ठेवण्याचा निर्णय बीड जिल्हा शिक्षक प्राध्यापक संस्थाचालक शिक्षकेतर कर्मचारी संघटना समन्वय समितीने घेतला आहे.

या बाबत अधिक माहिती अशी की,  बीड जिल्ह्यातील सर्व शिक्षक, प्राध्यापक, संस्थाचालक,  शिक्षकेतर कर्मचारी संघटनांची बैठक येथील तहसील हॉलमध्ये समन्वय समितीचे अध्यक्ष बाबा बडे यांच्या अध्यक्षतेखाली निमंत्रक राजकुमार कदम,  सरचिटणीस रामचंद्र ठोसर,  मार्गदर्शक डी.जी.तांदळे,  सुशिलाताई मोराळे,  उत्तम पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत  संपन्न झाली.

14 मार्च पासून राज्यात सर्व शासकीय, निमशासकीय शिक्षक शिक्षकेतर  कर्मचारी संघटना समन्वय समितीने जुनी पेन्शन लागू करावी या व इतर  मागण्यांसाठी बेमुदत राज्यव्यापी संप पुकारला आहे.

त्याच धर्तीवर या संपाची धार आणखी तिव्र करण्यासाठी रविवार दिनांक 19 /03 /2023 पासून राज्य सरकारी निमसरकारी शिक्षक शिक्षकेतर  कर्मचारी संघटना समन्वय समिती जिल्हा,  बीड यांच्या निर्णयानुसार तसेच बीड जिल्ह्यातील सर्व शिक्षक, प्राध्यापक, संस्था चालक, शिक्षकेत्तर कर्मचारी  संघटना समन्वय  समितीचा अशा प्रकारचा निर्णय घेण्यात आला आहे. की, या संपामध्ये बीड जिल्ह्यातील सर्व शाळा शंभर टक्के बंद ठेवून संप चालू असे पर्यंत शाळा बंद म्हणजे बंदच. संपकाळात कोणीही शाळेत न जाता पुकारलेल्या राज्यव्यापी संपाला उत्स्फूर्त प्रतिसाद देऊन सरकारला आपली एकजूट दाखवून देण्याचा निर्णय घेण्यात आला.

दहावी बारावीच्या उत्तर पत्रिका तपासणी तसेच नियमनावरही बहिष्कारचा निर्णय घेण्यात आला आहे.  कोणावरही कारवाई होणार नाही. झालीच तर त्याची सर्वस्वी जबाबदारी राज्य  समन्वय समितीने घेतली आहे.

बैठकीस मराठवाडा शिक्षक संघ, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती, ज्युक्टा, महाराष्ट्र शिक्षक संघटना, बीड जिल्हा संस्था चालक महामंडळ, डॉ. पंजाबराव देशमुख शिक्षक परिषद, अखिल महाराष्ट्र उर्दू शिक्षक संघटना, राष्ट्रवादी शिक्षक संघ, महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद, इंडियन बहुजन टिचर्स असोसिएशन (इब्टा), महाराष्ट्र राज्य उर्दू शिक्षक संघटना, शिक्षक भारती, बहुजन शिक्षक संघटना, जि.प. माध्यमिक व उच्च माध्यमिक कृती समिती, महाराष्ट्र राज्य

जुनी पेंन्शन संघटना, अखिल भारतीय उर्दू शिक्षक संघ, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ, मुप्टा शिक्षक संघटना,महाराष्ट्र राज्य उर्दू शिक्षक संघटना, महाराष्ट्र राज्य आदर्श शिक्षक समिती, अपंग कर्मचारी संघटना, शिक्षक सेना, प्रहार शिक्षक संघटना, आदर्श शिक्षक समिती, महाराष्ट्र राज्य केंद्र प्रमुख संघटना, ग्रेड मुख्याध्यापक संघ जि. प., एकल

शिक्षक संघटना इत्यादी संघटना सहभागी झाल्या. जुनी पेंन्शन मिळवून आपले व आपल्या भावी पिढ्यांचे भवितव्य सुरक्षित करण्यासाठी सरकारी निमसरकारी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी संघटना समन्वय समितीच्या खांद्याला खांदा लावून  संपात सहभागी होऊन उद्या पासून सर्व शाळा

शंभर टक्के बंद ठेवण्याचे आवाहन राजकुमार कदम, श्रीराम बहीर, दिपक घुमरे, राजेंद्र खेडकर, प्रा. सत्येंद्र पाटील, प्रा. चंद्रकांत मुळे,  हरिदास घोगरे, विष्णू आडे, कालिदास धपाटे, गणेश आजबे,  विजयकुमार समुद्रे, अनिल विद्यागर, मुजतबा अहेमद खान, आनंद पिंगळे, केशव आठवले, शेख इरशान,

अंकुश निर्मळ, शेख मुसा, बाळकृष्ण आहिरे,  रविंद्र खोड, संजय शिंदे, शेख माजेद, आर्सूळ सी. के, व्ही.  एन. फुलझळके, महेशकुमार तांदळे, सचिन हांगे, सुरेश ढास,  मदन सोनवणे, महेश सातपुते, सुरेंद गोल्हार, विकास गवते, सिद्दीकी अहेमद मंजूर, संजय वाघुले, पी. एस. तरकसे,

बाळासाहेब साळवे, चंद्रकां आर्सूळ, शेख माजेद,हाडूळे ए. बी.,सय्यद मुहम्मद नदीम, सदूल सुपेकर, कुलकर्णी डी.डी.,अविनाश काळे, भागवत सोनवणे, शेमे सर, आर. डी. जाधव यांनी केले आहे.