new ashti railway staion

ताज्या बातम्या

new ashti railway staion बीड जिल्ह्यात रेल्वेचे पहिले पाऊल पडणार खा.डॉ.प्रीतम मुंडे यांचे आवाहन

By admin

September 22, 2022

 

आष्टी

new ashti railway staion बीड जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी, दीन दलित, गोरगरीब,ऊसतोडणी मजूर,तसेच सर्वसामान्य जनतेच्या विकासासाठी स्वर्गीय लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेबांनी आपले आयुष्य वेचले आहे.. विकासाचा राजमार्ग असलेल्या नगर बीड परळी रेल्वे मार्गाचा शुभारंभ.. म्हणजे हे पहिले पाऊल असणार आहे.. हे पहिले पाऊल ..

आष्टी पर्यंत पडणारे हे पाऊल..

हा माझ्या दृष्टीने सुवर्णक्षण असून… माझ्या समवेत आपण या सुवर्ण क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे… असे आवाहन खा. डॉ.प्रीतम मुंडे यांनी केले आष्टी ahmednagar asthi railway येथील नियोजित रेल्वे स्थानकाच्या कामाची आणि कार्यक्रमाच्या तयारी ची पाहणी करून माजी आमदार भीमराव धोंडे यांच्या निवासस्थानी कार्यकर्त्यांसमोर बोलताना त्यांनी हे आवाहन केले.. यावेळी आमदार सुरेश धस, माजी आमदार भीमराव धोंडे,बीड जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष सविता गोल्हार,समाजसेवक विजय गोल्हार,आष्टी पंचायत समितीचे माजी सभापती आदिनाथ सानप रामदास बडे,एन.टी.गर्जे, देविदास नागरगोजे बबन अण्णा झांबरे अमोल तरटे शंकर देशमुख बाबू कदम भारतीय जनता पार्टीचे बीड जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के अल्पसंख्यांक आघाडीचे सलीम जहांगीर उपस्थित होते.

खासदार प्रीतम मुंडे पुढे म्हणाल्या बीड जिल्ह्याचा कोणताही कार्यक्रम असो त्याची राज्यात चर्चा होत असते .

.आष्टी ते नगर रेल्वे मार्गाच्या शुभारंभासाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे महसूल मंत्री विखे राधाकृष्ण विखे पाटील आदरणीय पंकजाताई मुंडे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

त्यामुळे या कार्यक्रमाला व्यापक स्वरूप प्राप्त झाले असून माझ्या पूर्वीच्या खासदारांनी बीड जिल्ह्यात रेल्वे येणार.. असा डांगोरा पिटला होता..

परंतु याबाबत मी भाग्यवान आहे मी २०१४ लोकसभा निवडणुकीमध्ये परळी पर्यंत रेल्वे मार्ग सुरू करण्यात येईल असे आश्वासन दिले होते परळी पर्यंत रेल्वे गेल्याशिवाय माझ्या आश्वासनाची पूर्तता होणार नाही हे मला माहित आहे परंतु आष्टी ते नगर हा पहिला टप्पा सुरू झाला आणि २०२४ पर्यंत आणखी वेगाने काम करून रेल्वे बीड आणि परळी पर्यंत सुरू होईल यासाठी मी प्रयत्न करणार आहे आपण सर्वजणांनी या आष्टी ते अहमदनगर सेवेच्या शुभारंभ प्रसंगी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या सुवर्णक्षणाचे साक्षीदार व्हावे हे निमंत्रण देण्यासाठी मी समक्ष आज आष्टी येथे आले आहे त्यामुळे आपण हजर राहावे असे आवाहनही त्यांनी शेवटी केले