National teacher awards 2026 Beed teacher

ताज्या बातम्या

बीड जिल्ह्यातील कविता नरसिंगराव गीते यांना राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार जाहीर

By admin

August 21, 2026

नवी दिल्ली,

National teacher awards 2026 Beed teacher केंद्र सरकारच्या वतीने दिला जाणारा राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार यंदा बीड जिल्ह्यातील कविता नरसिंगराव गीते आणि कुंदा जयवंत बच्छाव यांना जाहीर झाला आहे.

महाराष्ट्रातून यंदा या दोन महिलांना राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार जाहीर झाला आहे डॉक्टर कविता नरसिंगराव गीते या साने गुरुजी निवासी विद्यालय केज येथील माध्यमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका आहेत तर कुंदा बच्छाव या नासिक महानगरपालिकेच्या आनंदवल्ली येथील शिक्षिका आहेत.

राज्यातील सैनिक शाळेच्या शिक्षकांना दिला जाणारा राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार सातारा येथील सैनिक शाळेचे श्री शिव प्रसाद अरविंद टिंगरे यांना जाहीर झाला आहे.

केंद्र सरकारच्या वतीने 48 शिक्षकांची घोषणा करण्यात आली आहे.

5 सप्टेंबर शिक्षक दिनी या पुरस्काराचे वितरण राष्ट्रपतींच्या हस्ते दिल्ली येथे करण्यात येते.