Nashik sinnar accident सिन्नर-शिर्डी महामार्गावर अपघातात दहा ठार ३४ जखमी
नाशिक
Nashik sinnar accident सिन्नर-शिर्डी महामार्गावर खासगी आराम बस व ट्रक यांच्या समोरासमोर धडक झाली. त्यानंतर खासगी बस रस्त्यावर उलटली. या अपघातात दहा जणांचा मृत्यू झाला आहे. तर 34 जण जखमी झाले आहेत सिन्नर मधील वावी- पाथरे गावाच्या दरम्यान आज सकाळी सहा वाजेच्या सुमारास हा भीषण अपघात झाला. दहा जणांचे मृतदेह सिन्नर ग्रामीण रुग्णालयाच्या आणण्यात आले आहेत. तर ३४ जण जखमी असून त्यांना सिन्नर मधील विविध खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
अमरनाथ, उल्हासनगर भागातून रात्री साडेअकरा वाजेच्या सुमारास गाईड कंपनीची खासगी आराम बस (क्र. एम एच ०४ एफ के २७५१) सुमारे ५० प्रवाशांना घेऊन शिर्डी कडे निघाली होती. वावी गाव ओलांडल्यावर आराम बस आणि माल ट्रक (क्र. एम एच ४८ यांची समोरासमोर धडक झाली आणि हा अपघात घडला यआराम बसमधील बहुसंख्य प्रवासी गंभीर जखमी आहेत. घटनास्थळी प्रचंड वाहतूक कोंडी झाली होती. ७ ते ८ रुग्णवाहिका रुग्णांना रुग्णाला देण्यासाठी दाखल झाल्या होत्या. सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर कोते यांच्यासह वावी पोलिसांचे पथकही घटनास्थळी हजर झाले होते. स्थानिक नागरिकांनी मोठ्या प्रमाणात मदतकार्य राबवून जखमींना रुग्णालयात दाखल करण्यास मदत केली.जखमींमध्ये महिला आणि बालकांचा समावेश आहे. तर मृतांमध्ये सहा महिला दोन पुरुष व दोन लहान बालकांचा समावेश आहे.