नाशिक Nashik news accident शहरातील औरंगाबाद रोडवरील आज यवतमाळ येथून मुंबईला जाणाऱ्या खासगी ट्रॅव्हलच्या बसला अपघातानंतर आग लागल्याने 11 जणांचा जळल्याने मृत्यू झाला तर 38 जण जखमी झाले असून त्यांना नाशिकच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहेत. आज पहाटे पाच वाजेच्या सुमारास हॉटेल मिरची जवळील चौफुलीवर हा अपघात घडला. Today news accident यवतमाळ येथून नाशिक मार्गे मुंबईला निघालेल्या चिंतामणी ट्रॅव्हल्सची चौफुलीवर एका कोळसा नेणाऱ्या आयशर ट्रकशी धडक झाली त्यानंतर बसला आग लागली. त्यामुळे काही प्रवाशांनी बसच्या खिडकीतून उड्या मारल्या. मात्र काहींचा बसमध्येच होरपळून मृत्यू झाला. Nashik road news today अपघाताची माहिती मिळताच नाशिक महापालिकेचे चार बंब घटनास्थळी दाखल झाले. तसेच पोलीस दल आणि चार ते पाच रुग्णवाहिका दाखल झाल्या होत्या साधारणपणे अर्धा तासाने पेटलेली बस विझवण्यात आली. अपघात इतका भीषण होता की अपघातानंतर बस 50 ते 60 फूट पुढे घसरत गेली. पेटल्याने बसही जाळून खाक झाली. पोलिसांनी स्थानिक नागरिक आणि वैद्यकीय पथकाच्या मदतीने जखमींना जिल्हा रुग्णालयात दाखल केले.bus accident news नाशिकचे जिल्हाधिकारी गंगाथरन डी यांनी रुग्णालयात भेट देऊन माहिती घेतली तसेच दहा जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती दिली. नाशिकमधील भाजप आमदार देवयानी फरांदे, शिवसेना शिंदे गटाचे आमदार सुहास कांदे यांनी जिल्हा रुग्णालयात भेट देऊन रुग्णांची विचारपूस केली. जखमींमध्ये 10 पुरुष, 20 महिला आणि 8 मुलांचा समावेश आहे.