ताज्या बातम्या

शहीद महेंद्र अंबुलगेकर यांच्यावर अंबुलगा इथं शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार .

By admin

February 04, 2024

Nanded shahid jawan शहीद महेंद्र अंबुलगेकर यांच्यावर अंबुलगा इथं शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार … अमर रहे.. अमर रहे च्या घोषणा निनादल्या…

नांदेड

Nanded shahid jawan  नांदेड तालुक्यातील बळीरामपूर येथील रहिवासी शहीद महेंद्र बालाजी अंबुलगेकर यांच्या पार्थिवावर आज दुपारी कंधार तालुक्यातील अंबुलगा इथं शोकाकूल वातावरणात शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. महेंद्र अंबुलगेकर यांना अरुणाचल प्रदेशात कर्तव्य बजावताना 31 जानेवारी रोजी सायंकाळी वीरमरण प्राप्त झाले होते. महेंद्र अंबुलगेकर हे अरुणाचल प्रदेशात बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन मध्ये कार्यरत होते. त्यांचे पार्थिव आज रविवारी सकाळी बळीरामपूर इथं आणण्यात आले आहे. पार्थिव पोहोचताच कुटुंबीयांना शोक आवरता आला नाही. हजारो नागरिक यावेळी अंत्यदर्शनासाठी उपस्थित होते. त्यानंतर शहीद अंबुलगेकर यांचे पार्थिव मूळ गावी कंधार तालुक्यातील अंबुलगा इथं नेण्यात आले. शासकीय इतमामात त्यांच्यावर अंबुलगा इथं अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी खासदार प्रताप पाटील चिखलीकर, मुखेडचे आमदार डॉ. तुषार राठोड, निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर यांच्यासह हजारो नागरिकांची यावेळी उपस्थिती होती.