ताज्या बातम्या

न्यू आष्टी ते अंमळनेर रेल्वे 110 किमी वेगाने धावली आष्टी

By admin

January 05, 2024

आष्टी

nagar ashti amalner train अहमदनगर बीड परळी रेल्वे मार्गांवरील अहमदनगर आष्टी  रेल्वे सुरु झाल्यानंतर रेल्वेचा पुढचा टप्पा चे स्पीड टेस्ट आज घेण्यात आली. ही टेस्ट आष्टी ते अंमळनेर पर्यंत घेण्यात आली. रेल्वे विभागाचे सुरक्षा विभागाचे मनोज अरोरा यांच्या उपस्थितीत हे परीक्षण करण्यात आले. यावेळी ताशी 110 किमी वेगाने ही रेल्वे धावली.

काही दिवसात नगर ते अंमळनेर दरम्यान रेल्वे सेवा सुरु होणार आहे. या वर्षाच्या प्रारंभी ही रेल्वे सुरु होणार आहे.  यापूर्वी सोलापूरवाडी ते आष्टी अशी स्पीड टेस्ट घेऊन नगर ते न्यू आष्टी अशी रेल्वे सुरु करण्यात आली होती.

दोन वर्षापूर्वी अहमदनगर पासून ते सोलापूरवाडी दरम्यात ह्या रेल्वेची चाचणी घेण्यात आली होती. एकूण ३५ किमी अंतर ही चाचणी घेण्यात आली होती. आतापर्यंत तीन चाचण्या झाल्या. एकदा  नगर ते नारायणडोह पर्यंत बारा किमी, आणि नगर ते सोलापूरवाडी ३५.५ किलोमीटर आणि नगर ते आष्टी हे ६० किमी चे.सध्यस्थीतीत नगर ते एगनवाडी पर्यन्त ६६.१२  किमी अंतरावर रेल्वेचे काम १०० टक्के पूर्ण झाले असुन त्यासाठी  चाचणी घेण्यात आली असल्याचे रेल्वे विभागाने सांगितले.

या   नगर ते अंमळनेर  या ६६  किलोमीटर अंतरावर हाय स्पीड चाचणी साठी सकाळी सर्व अधिकारी न्यू आष्टी रेल्वे स्थानकावर आले होते. त्यानंतर त्यांनी न्यू आष्टी पासून ते  अंमळनेर तयार करण्यात आलेल्या नवीन रेल्वे रुळाची पाहणी केली. तसेच सर्व सुरक्षा विषयक मानकांची पाहणी केल्यानंतर रेल्वे सुरक्षा आयुक्त मनोज अरोरा (सीआरएस) यांनी सुरक्षा तपासणीनंतर नव्याने उघडलेल्या  मार्गाचे सुरक्षित प्रमाणपत्र दिले. यावेळी मुख्य प्रशासकीय अधिकारी अविनाश पांडे,  डीआरएम सोलापूर नीरज कुमार दोहरे,मुख्य अभियंता रेल्वे दिनेश कटारिया, मुख्य अभियंता एस डी पटेल, मुख्य सिग्नल अधिकारी अभियंता मिश्रा जी, प्रिन्सिपल चीफ इंजिनिअर श्री राम, उपमुख्य अभियंता आर के यादव उपस्थित होते.

110 kmph ने स्पिड ट्रायल करण्यात आले.

आता ट्रायल पूर्ण झाल्याने नगर अंमळनेर पर्यंतचा रेल्वे सुरु होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.