mpkv phd

ताज्या बातम्या

mpkv phd प्रा.गणेश नामदेव शेळके यांना महात्मा फुले कृषी विद्यापीठाकडून आचार्य (Ph.D.) पदवी प्रदान

By admin

February 21, 2023

 

आष्टी प्रतिनिधी

mpkv phd परभणी येथील मराठवाडा कृषी विद्यापीठ मान्यता प्राप्त आष्टी येथील आनंद चारिटेबल संस्था संचलित श्री छत्रपती शाहू, फुले, आंबेडकर कृषी महाविद्यालयाचे प्राध्यापक म्हणून कार्यरत असणारे गणेश शेळके यांना कृषी अभियांत्रिकी (Agricultural Engineering) शाखेतील प्रक्रिया आणि अन्न अभियांत्रिकी (Process and Food Engineering) या विषयांमध्ये आचार्य (Ph.D) पदवी प्रदान करण्यात आली आहे.

त्यांनी आचार्य पदवीसाठी महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी येथे प्रवेश घेतला होता. संशोधनामध्ये प्राध्यापक गणेश शेळके यांनी जांभूळ फळाच्या रसापासून पावडर निर्मिती प्रक्रिया व साठवणूक स्थिरतेचा अभ्यास केला .

तसेच जांभूळ पावडर चा वापर चीज या दुग्धजन्य पदार्थामध्ये करून या पदार्थाचे पौष्टिक आणि औषधी मूल्ये वाढवले. या संशोधनासाठी महात्मा फुले कृषी विद्यापीठामधील डॉ. अण्णासाहेब शिंदे कृषी अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान महाविद्यालयाच्या कृषी प्रक्रिया अभियांत्रिकी विभागाचे प्राद्यापक डॉ. विक्रम कड यांचे मार्गदर्शन लाभले.

प्राद्यापक गणेश शेळके यांनी मिळवलेल्या यशाबद्दल संस्थेचे संस्थापक अध्यक्ष माजी आ. भीमराव धोंडे, संचालक डॉ. अजयदादा धोंडे, अभयराजे धोंडे , संस्थेचे प्रशासन अधिकारी डॉ. डी. बी. राऊत, प्रा. एस. जी. विधाते, प्राचार्य श्रीराम आरसुळ, दत्तात्रय गिलचे, माऊली बोडखे, संजय शेंडे, साईनाथ मोहोळकर, प्रा.पोपट काळे, इंजि. प्रवीण जाधव, शरद पवार व कृषी महाविद्यालय व आनंद शैक्षणिक संकुलामधील सर्व महाविद्यालयातील प्राध्यापक, प्राध्यापिका, शिक्षकेतर कर्मचारी यांनी प्राध्यापक गणेश शेळके यांचे अभिनंदन केले.