मिशन डिजिटल इंडियातील विविध योजनेचा लाभ तळागाळातील गरजूंपर्यत पोहचविणार —–आ.सुरेश धस
आष्टीत मिशन डिजिटल इंडिया योजनेचा शुभारंभ
प्रत्येक लाभार्थ्यांना ५ लाख रुपयांचे आरोग्य कवच
आष्टी, mission digital india yojna ही देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजींची संकल्पना अस्तित्वात आल्यापासून बोगसगिरीला आळा बसला व प्रत्येक गरजूंपर्यंत शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळाला आष्टी,पाटोदा,शिरूर मतदारसंघात या योजना प्रभावीपणे येणाऱ्या काळात राबविणार असून तळागाळातील प्रत्येक गरजू पर्यंत मिशन डिजिटल इंडियातील विविध योजना पोहचविणार असल्याचे प्रतिपादन आमदार सुरेश धस यांनी केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सुरू केलेल्या मिशन डिजिटल इंडिया या कार्यशाळेचे आ.सुरेश धस यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय जनता पार्टीच्या वतीने आष्टी येथे लक्ष्मी लॉन येथे आयोजन करण्यात आले होते.या कार्यशाळेत भारतीय जनता पार्टीच्या प्रमुख कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते.या कार्यशाळेत प्रमुख मार्गदर्शक म्हणून राज्य प्रमुख डिजिटल ग्रामीण सेवाचे संजय पाटील हे होते.
तर भारतीय जनता पार्टी आष्टी तालुकाध्यक्ष साहेबराव म्हस्के,पाटोदा तालुकाध्यक्ष भागवत येवले,आष्टी पंचायत समिती गटविकास अधिकारी सुधाकर मुंडे,महेंद्र गर्जे आदी व्यासपीठावर उपस्थित होते.
जागतिक महिला दिनानिमित्त नारी गौरव पुरस्कार वितरण
यावेळी आमदार धस पुढे बोलताना म्हणाले,भारतीय जनता पार्टीचे सरकार अस्तित्वात आल्यापासून पंतप्रधानपदी नरेंद्र मोदी हे विराजमान झाल्यापासून त्यांनी त्यांच्या संकल्पनेतून जन आरोग्य योजना,ई-श्रम योजना,पीएम एनडीएचएम योजना,पीएम किससान योजना, ई-मुद्रा योजना,वन नेशन वन राशन कार्ड योजना,जनकल्याण आरोग्य योजना, जनधन योजना अशा विविध योजना असतील या योजनेच्या माध्यमातून भारत देशामध्ये गोरगरिबांच्या प्रत्येकांच्या घरामध्ये या योजनेचा लाभ मिळत आहे.
स्वर्गीय इंदिरा गांधी नंतर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे नाव प्रत्येक घराघरात पोहोचले आहे.मतदारसंघातील गरजूचे आभा कार्ड नविन तयार करून घेणार असून अनेक लाभार्थ्यांची नोंद नाही सर्वेक्षण करण्यात आले नाही तरी ज्यांची नावे नाही अशा लाभार्थ्यांची रिक्वेस्ट पाठवली कि नाव नोंदणी होणार आहे.
आयुष्यमान भारत योजनेतून प्रत्येक लाभार्थ्यांना ५ लाख रुपयांचे आरोग्य कवच मिळणार आहे.या योजनेसाठी प्रत्येक गावात आपण दोन आरोग्य सेवक नियुक्त करणार असून या योजनेपासून वंचित असणाऱ्या प्रत्येक लाभार्थ्यांपर्यत तर आरोग्य सेवक पोचणार आहेत.जे लाभार्थी खरच यात वंचित आहेत त्यांना या दोन आरोग्य सेवकांमार्फत ऑनलाइन व इतर अडचणी बाबत कळवले जाईल. याचाच एक भाग म्हणून किसान योजनेच्या अंतर्गत प्रत्येक व्यक्तीला गोरगरीब शेतकऱ्याला वर्षाकाठी सहा हजार रुपये मिळत असल्याने ते मोठ्या आनंदात आहेत. मोदीचे पैसे आले असे समाधानाने म्हणत आहेत.जनकल्याण आरोग्य योजनेमार्फत मोठमोठ्या आजारावर गोरगरिबांना उपचार करण्यासाठी पैशाची मोठी अडचण निर्माण व्हायची मात्र या योजनेमुळे लाभार्थ्यांना कॅन्सर सारख्या आजारावरील ऑपरेशन असेल अथवा इतर काही आजार असेल त्यांना कसलाही प्रकारचे पैसे लागत नाही.
आता या पुढच्या काळात देखील मोठ्या प्रमाणावर वेगवेगळ्या योजना राबवल्या जात आहेत.ही प्रत्येक योजना ही डिजिटल इंडिया ऑनलाइन च्या माध्यमातून राबवली जात असल्याने यामध्ये कसलाही प्रकारचा भ्रष्टाचार न होता हे या योजनेचा लाभ प्रत्येक व्यक्तीला मिळत आहे.त्याच बरोबर मतदारसंघात देखील या योजनेचा लाभ तळागाळातील गरजू व्यक्तीला मिळाला पाहिजे.यासाठी आपण प्रभावी पणे काम करणार आहोत.
यावेळी आष्टी,पाटोदा,शिरूर का.तालुक्यातील प्रत्येक गाव,वाडी- वस्तीवरील प्रतिनिधी या कार्यशाळेत उपस्थित होते.