*सुर्यकांत विश्वासरावांची संपूर्ण मराठवाड्यात लाट – पी.एस.घाडगे* जुनी पेन्शन लागू केल्याशिवाय पेन्शन घेणार नाही – सुर्यकांत विश्वासराव मराठवाडा शिक्षक संघाचे सूर्यकांत विश्वासराव यांचा उमेदवारी अर्ज दाखल.
औरंगाबाद / प्रतिनिधी
Marathwada Teacher constituency मराठवाडा शिक्षक संघाचे उमेदवार विश्वासराव यांच्या विषयी सहानुभूतीची लाट निर्माण झाली आसून त्यांचा विजय आता कोणीही रोखू शकत नाही असे प्रतिपादन संघटनेचे जेष्ठ मार्गदर्शक पी.एस.घाडगे यांनी केले तर माझा मालक (गॉडफादर) शिक्षक असून मी निवडून आल्यास जो पर्यंत जुन्या पेन्शन लागू होत नाही तोपर्यंत पेन्शन घेणार नाही असे प्रतिपादन सुर्यकांत विश्वासराव यांनी केले.
30 जानेवारी रोजी होत असलेल्या औरंगाबाद विभाग शिक्षक मतदार संघातील निवडणुकीसाठी बुधवार (दि.11) रोजी मराठवाडा शिक्षक संघाकडून संघटनेचे अध्यक्ष तथा उमेदवार सुर्यकांत विश्वासराव यांनी मराठवाड्यातील हजारो शिक्षकांच्या उपस्थित नामांकन दाखल केले. यावेळी शिक्षक, प्राध्यापकांना संबोधित करताना घाडगे व विश्वासराव यांनी वरील प्रमाणे प्रतिपादन केले. स्वर्ग फंक्शन हॉल येथून आयुक्त कार्यालया पर्यंत मराठवाडा शिक्षक संघाची भव्य रॅली निघाली. शिक्षकांचा मतदार संघ शिक्षकांच्या ताब्यात घेण्याचा निर्धार मराठवाड्यातून आलेल्या शिक्षकांनी यावेळी व्यक्त केला. आवेदनपत्र भरल्या नंतर झालेल्या जाहीर सभेस मराठवाडा शिक्षक संघाचे सरचिटणीस तथा विभागीय प्रचार प्रमुख राजकुमार कदम, प्राध्यापक संघटनेचे प्रा. डॉ. मारोती तेगमपुरे, संस्था चालक संघटनेचे अशोक पाटील सुगावकर, पुरोगामी शिक्षक संघटनेचे प्रा. चंद्रकांत चव्हाण, डॉबाआंमविद्यापीठाचे अधिसभा सदस्य डॉ. उमाकांत राठोड, मार्गदर्शक पी . एस. शिंदे, त्रिंबक इजारे, विश्वंभर भोसले, संजय सिरसट, बी. पी. चेसले यांनी मार्गदर्शन केले. मराठवाडा शिक्षक संघाच्या जेष्ठ नेत्या सुलभा मुंडे, संघटनेचे कोषाध्यक्ष ए. बी. औताडे, उपाध्यक्ष ज्ञानोबा वरवट्टे, एस.जी. गुट्टे, सहसचिव माळी एन.जी, टी.जी. पवार, केंद्र कार्यकारिणी सदस्य, सर्व जिल्हाध्यक्ष, जिल्हा सचिव, तालुका पदाधिकारी कार्यकर्ते हजारोंच्या संख्येने उपस्थित होते. सुत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन डी.जी.तांदळे यांनी केले.