maratha arakshan latest update

ताज्या बातम्या

मनोज जरांगे पाटील यांची पत्रकार परिषेदत मोठी घोषणा!

By admin

October 22, 2023

 

 

जालना

maratha arakshan latest update मराठा आरक्षण जाहीर करण्यासाठी सरकारनं जो अवधी घेतला होता तो २४ तारखेला संपत आहे. २४ तारखेच्या आत राज्य सरकारनं जर मराठा आरक्षण जाहीर केलं तर २५ तारखेपासून मी आमरण उपोषण करणार असून अन्न पाणी आणि कोणताही उपचार घेणार नसून ‘कठोर उपोषण करणार असल्याची घोषणा मराठा संर्घर्ष योद्धा manoj jarange patil मनोज जरांगे पाटील यांनी आज केली.

यामुळे आरक्षण देण्यासाठी राज्य सरकारकडे अवघा दोन दिवसांचा अवधी शिल्लक राहिला आहे. अंतरवाली सराटीत पत्रकार परिषद घेवून मनोज जरांगे यांनी मराठा आरक्षणाबाबत आंदोलनाची पुढची दिशा जाहीर केली.

यापूर्वी १४ ऑक्टोबर रोजी अंतरवाली सराटी येथे लखोने जमलेल्या मराठ्यांच्या गर्दीला उद्धेशून मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला मराठा आरक्षणासंदर्भात २४ तारखेपर्यंतचा अल्टिमेटम दिला होता व येत्या २२ ऑक्टोंबर रोजी जाहीर jalna news पत्रकार परिषद घेवून मराठा आरक्षणासंदर्भात पुढील आंदोलनाची दिशा ठरवण्यात येईल अशी जाहीर घोषणा केली होती.

मनोज जरांगे पाटील २५ ताखेपासून पुन्हा आमरण उपोषणाला बसणार, गावांत पुढाऱ्यांना फिरकू देणार नाही. महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हापरिषद सर्कलमध्ये ५ कोटी मराठे साखळी उपोषण करणार

आज २२ ऑक्टोबर रोजी दुपारी ३ वाजता मनोज जरांगे यांनी मराठा आरक्षणाच्या आंदोलनाची पुढील दिशा ठरवताना मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी सरकारनं जो वेळ घेतला होता त्याबाबत पुढील आंदोलनाची दिशा आज स्पष्ट करत असल्याचे सांगितले. ‘

राज्य सरकारनं जर २४ पर्यंत मराठा सरकारच्या आरक्षणाचा निर्णय घेतला नाही तर २५ तारखेपासून मी मराठा समाजाला आरक्षण मिळाव म्हणून २५ तारखेपासून आमरण उपोषण पुन्हा सुरु करणार आहे. त्या उपोषणात पाणी, अन्न व उपचार घेणार नाही,एकदम कठोर उपोषण सुरु करणार असं सांगितलं.

आमच्या गावात मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटेपर्यंत कोणत्याही राजकीय नेत्याला येवू दिलं जाणार नाही,आरक्षण घेवूनच गावात यायचं नाही तर आमच्या गावाची शिवही ओलांडायची नाही असा इशाराही मनोज जरांगे पाटील यांनी राजकीय नेत्यांना दिला.

राज्यातील प्रत्येक जिल्हा परिषदेच्या सर्कलमध्ये एका ठिकाणी साखळी उपोषणं करण्यात येणार आहे. त्या त्या सर्कलमधील गावांच्या वतीने एकाच ठिकाणी ताकदीनं साखळी उपोषण महाराष्ट्रभर सुरु केलं जाणार आहे. यासाठी सर्कलनिहाय गावांनी तयारी सुरु केली असल्याची माहितीही जरांगे यांनी दिली.

मराठा समाजाची उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहिर माफी मागावी

आंदोलनाचा एक भाग म्हणून प्रत्येक तालुक्यात आणि प्रत्येक गावांत प्रचंड संख्येने मराठा समाज एकत्र येवून कॅण्डल मार्च काढणार आहे. हे शांततेचं आदोलन सुरु झाल्यानंतर हे सरकारला झेपणार नाही. २५ तारखेनंतर सरकारला पुढील आंदोलन पेलणार नाही. कारण दोन टप्प्ये आंदोलनाचे पाडले जाणार आहे.

माझं आमरण उपोषण आणि सर्कलचे उपोषण हे महाराष्ट्रातील ५ कोटी मराठे चालवणार आहे. पुढील आंदोलनाची दिशा ही सरकारला पेलणारी आणि झेपणारी नसेल.२५ तारखेला पुन्हा पुढील आंदोलनाची दिशा ठरवली जाणार आहे.त्यामुळे २४ तारखेच्या आत आरक्षण जाहीर करा,असा अल्टिमेटम पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील यांनी आज दिला.