जालना
Manoj jarange patil uposhan update मनोज जरांगे यांनी विविध मागण्यासाठी केलेल्या उपोषणामुळे त्यांची तब्बेत खालवली होती.त्यानंतर त्यांनी रात्री उपचार घेतले. रात्री अडीच वाजता जिल्हा शल्य चिकित्सक राजेंद्र पाटील आणि डॉक्टरांच्या टीमने मनोज जरांगे यांना उपचार घेण्याचा आग्रह केला. यावेळी मनोज जरांगे यांना तीन सलाईन लावण्यात आले होते.
मनोज जरांगे यांनी तब्येतीची काळजी घ्यावी अशी विनंती छत्रपती संभाजीनगरचे नवनिर्वाचित खासदार संदीपान भूमरे यांनी मनोज जरांगे पाटलांकडे केली होती. नवनिर्वाचित खासदार संदीपान भुमरे यांनी जालन्यातल्या अंतरवाली सराटीत मनोज जरांगे पाटलांची भेट घेतली. यावेळी भुमरे यांनी जरांगे यांच्यासोबत चर्चा करण्याचे खूप प्रयत्न केले मात्र जरांगे यांनी त्यांच्या चर्चेला प्रतिसाद दिला नाही.
आम्हाला आपली गरज आहे असं भुमरे जरांगेंना म्हणालेत. सरकार सकारात्मक आहे, निश्चित याबाबत मार्ग निघेल अशी प्रतिक्रिया नवनिर्वाचित खासदार संदिपान भुमरे यांनी जरांगेंच्या भेटीनंतर माध्यमांशी बोलताना दिलीय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मी स्वतः बोलेन आणि जितक्या लवकर या प्रश्नाबाबत मार्ग काढता येईल तितक्या लवकर आम्ही मार्ग काढू अशी प्रतिक्रिया खासदार संदीपान भुमरे यांनी दिलीय.