Manoj jarange new andolan announced

ताज्या बातम्या

मराठा आंदोलक मनोज जरांगे 30 मे रोजी पुन्हा आमरण उपोषण सुरू करणार.

By admin

May 16, 2026

jalna

Manoj jarange new andolan announced मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी 30 मे रोजी पुन्हा आमरण उपोषण सुरू करण्याची घोषणा केली आहे. जालन्यातील अंतरवाली सराटी येथे आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली.

मराठा समाजाच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी जरांगे पुन्हा एकदा आमरण उपोषण करणार आहेत. अंतरवाली सराटी येथील हे त्यांचे नववे आमरण उपोषण असणार आहे. यापूर्वी त्यांनी आठ वेळा आमरण उपोषण केले असून, त्यापैकी दोन उपोषणांदरम्यान अंतरवाली सराटी ते मुंबई असा मोर्चा काढत मुंबईतही उपोषण केले होते.

सरकारने वारंवार मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन दिले, मात्र अद्याप काही मागण्या प्रलंबित असल्याने जरांगे यांनी पुन्हा उपोषणाची हाक दिली आहे. तसेच, सरकारने 30 मेपर्यंत उर्वरित मागण्या पूर्ण कराव्यात, अशी मागणीही त्यांनी केली आहे.