माळीवाडा बसस्थानक

ताज्या बातम्या

आता नगरच्या माळीवाडा बसस्थानकातून सुटणार नाहीत बस

By admin

August 31, 2024

अहमदनगर

शहरातील अनेक वर्षापासुनचे जुने असलेल्या माळीवाडा बसस्थानकातून आता बस धावणार नाहीत. त्यासाठीचे पत्र अहमदनगर आगारातून काढण्यात आले आहे. त्यामुळे या बसस्थानकातून सुटणाऱ्या गाड्या आता या बस स्थानकातून सुटणार नाहीत आणि येथे येणार ही नाहीत.त्या तारकपूर येथील बस स्थानकातून सुटणार आहेत आणि इथेच येणार आहेत. यासंदर्भातील आदेश विभाग नियंत्रक अहमदनगर यांनी सांगितले आहे.

शहरातील माळीवाडा बस स्थानकातून सुटणाऱ्या गाड्या बस गाड्या आता तारकपूर आगारातून सुटणार आहेत राज्य परिवहन मंडळाच्या माळीवाडा बस स्थानकाचे पुनर्बांधणी काम दिनांक 4 सप्टेंबर पासून सुरू करण्यात येणार आहे. 

त्यामुळे या बस स्थानकातून मार्गस्थ होणाऱ्या गाड्या आता तारकपूर बस स्थानकातून सुटणार आहेत. राज्य परिवहन महा मंडळाच्या माळीवाडा बस स्थानकातून सुटणाऱ्या पंढरपूर,सोलापूर, तुळजापूर, धुळे, नाशिक, कल्याण, श्रीरामपूर, संगमनेर आणि नेवासा मार्गावरील सर्व बसेस तारकपूर बस स्थानक येथूनच सुटतील व येथेच संपतील .

तसेच माळीवाडा बस स्थानकातून फक्त राज्य परिवहन मंडळाच्या तारकपूर, पारनेर, श्रीगोंदा, जामखेड, पाथर्डी, शेवगाव या आगारांच्या ग्रामीण फेऱ्या मार्गस्थ होतील. तसेच श्रीगोंदा ,पारनेर, जामखेड या आगारांनी आपल्या नाशिक धुळे बसेस जाताना माळीवाडा बस स्थानकात घेऊन जाऊ नये.असेही आदेश त्यांनी दिले आहेत.