ताज्या बातम्या

शेतीसाठी माजलगाव धरणातून पाणी सोडले

By admin

June 26, 2023

आप्पासाहेब जाधव यांच्या आंदोलनाला यश

सतीश मोरे,

माजलगाव:

majalgaon news  तालुक्यात पावसाने उशीर केल्यामुळे शेतीला पाण्याची आवश्यकता होती, यासाठी आप्पासाहेब जाधव यांच्या नेतृत्वाखाली माजलगाव धरणातील पाणी सोडा या मागणीसाठी हजारो शेतकऱ्यांना सोबत घेऊन रास्ता रोको करत तिव्र आंदोलनाचा इशारा दिला होता, मागणी मान्य करत आज पाणी सोडण्यात आले.

याबद्दल जिल्हाधिकारी, तहसिलदार, पोलिस अधिकारी, पाटबंधारे विभागाचे सर्व अधिकारी व कर्मचारी यांचे शेतकऱ्यांच्या वतीने आप्पासाहेब जाधव यांनी आभार व्यक्त केले.

माजलगाव धरणाच्या उजव्या कालव्यातून दिनांक 26 जून 2023 रोजी दुपारी 12 वाजता 400 क्युसेक्स व दुपारी 04 वाजता 200 क्युसेस वाढ करून असा एकूण 600 क्युसेस विसर्ग सोडला, हे शेतीसाठी आवश्यक होते, जनतेच्या हितासाठी योग्य निर्णय घेतल्याबद्दल प्रशासनाचे आभार आप्पासाहेब जाधव यांनी व्यक्त केले.

माजलगाव धरणातून पाणी सोडण्यासाठी आप्पासाहेब जाधव आंदोलन करत गेले दीड महिना झालं पाणी सोडले नव्हते, याबद्दल प्रशासनाचे लक्षवेधत, तालुक्यातील कालवा लाभार्थी शेतकऱ्यांचे ऊस वाळत होते.

त्यामुळे माजलगाव परभणी रोडवर पवारवाडी देवकृपा नगर येथे दिनांक 23 जून सोमवार रोजी हजारो शेतकऱ्यांना घेऊन रास्ता रोको आंदोलन केले होते, त्या आंदोलनाला यश आले आहे, याबद्दल शेतकऱ्यांमधून समाधान व्यक्त केले जात आहे.