ताज्या बातम्या

आष्टी तालुका युवा पत्रकार संघातर्फे ‘महाराष्ट्र आयकॉन अवॉर्ड्स’ सोहळ्याचे शनिवारी अहिल्यानगर येथे भव्य आयोजन

By admin

June 19, 2026

अहिल्यानगर। प्रतिनिधी

Maharashtra icon awards आष्टी तालुका युवा पत्रकार संघ, आष्टी (जि. बीड) यांच्या वतीने राज्यस्तरीय ‘महाराष्ट्र आयकॉन अवॉर्ड्स 2026’ सोहळ्याचे भव्य आयोजन करण्यात आले असून, विविध क्षेत्रांत उल्लेखनीय व समाजोपयोगी कार्य करणाऱ्या कर्तृत्ववान व्यक्तींना या सोहळ्यात राज्यस्तरीय सन्मानाने गौरविण्यात येणार आहे, अशी माहिती संघाचे अध्यक्ष अविनाश कदम यांनी दिली.

हा पुरस्कार वितरण सोहळा शनिवार, दि. 20 जून 2026 रोजी सकाळी 11 वाजता सावेडी, मनमाड रोड, अहिल्यानगर येथील हॉटेल मेघनंद लॉन्स अँड रेस्टॉरंट येथे संपन्न होणार आहे.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आष्टी-पाटोदा-शिरूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुरेश धस हे राहणार असून, प्रमुख उपस्थिती म्हणून आमदार संग्राम जगताप, आमदार अक्षय कर्डिले, आमदार काशिनाथ दाते, महापौर ज्योती गाडे, उपमहापौर धनंजय जाधव, नगरसेवक सुरेश बनसोडे, नगरसेवक संपत बारस्कर, ह.भ.प. महंत काशिनाथ महाराज तसेच सुधाताई कांकरिया, रेश्माताई आठरे, स्वातीताई जाधव आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

या सर्व मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार विजेत्यांचा गौरव करण्यात येणार आहे.आष्टी तालुका युवा पत्रकार संघाच्या पाचव्या वर्धापनदिनानिमित्त या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असून, राज्यभरातील विविध क्षेत्रांतील कर्तृत्ववान व्यक्तींना एक व्यासपीठ उपलब्ध करून देणे हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश आहे.

समाजहितासाठी उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा सन्मान करून नव्या पिढीला प्रेरणा देण्याचा संघाचा मानस असल्याचे आयोजकांनी सांगितले.या कार्यक्रमाचे प्रमुख संयोजक आष्टी तालुका युवा पत्रकार संघाचे अध्यक्ष अविनाश कदम, उपाध्यक्ष जावेद पठाण, सचिव गहिनीनाथ पाचबैल यांच्यासह

समीर शेख, अक्षय विधाते, सोपान पगारे, अतुल जवणे, प्रेम पवळ, निसार शेख, राजेंद्र लाड, ॲड. किशोर निकाळजे, सय्यद बबलू, मनोज सातपुते, दादा पवळ, अमोल जगताप, अशोक कुताळ, आदिनाथ ठोंबरे, संतोष तांगडे, मारुती

सत्रे, अतुल जाधव, किरण शिनगिरे, ओंकार कदम, संस्कार लाड, सचिन पवार, सागर दळवी, संदीप हाडे आदी पत्रकार परिश्रम घेत आहेत.तरी या भव्य सोहळ्यास नागरिकांनी व विविध क्षेत्रातील मान्यवरांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

या मान्यवराचा राज्यस्तरीय पुरस्काराने होणार सन्मान

ह.भ.प. महंत काशीनाथ महाराज शास्त्री — अध्यात्मिक,ह.भ.प. समाधान महाराज नाडकर — अध्यात्मिक,सौ. सुशिला पवळ व श्री. रमेश पवळ — आदर्श पालक (माता पिता),सय्यद चाऊस — आदर्श कुस्तीपट्टू (महाराष्ट्र केसरी),डॉ. मुकुंद विधाते —आदर्श डॉक्टर,डॉ. संदीप गाडे — आदर्श डॉक्टर,डॉ. महेश नाथ — आदर्श दंतवैद्य, समाजसेवक, नवउद्योजक बद्रीनाथ जगताप — आदर्श प्रगतशील शेतकरी,परिवंत गायकवाड — आदर्श समाजसेवक,श्री. अमोलक जैन प्रसारक मंडळ — आदर्श शैक्षणिक संस्था,सागर आमले — आदर्श सरपंच,गोरख तरटे — आदर्श कृषी अधिकारी,संतोष दाणी — आदर्श मुख्याध्यापक समाजसेवक,बाळासाहेब भुकन — आदर्श गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर,भारती (सावित्री) अनिल शेवते — आदर्श मानद वन्यजीव रक्षक,श्रीमती सुषमा प्रकाश राठोड — आदर्श उद्योजिका,भरत गळगटे — आदर्श प्रगतशील पशुपालन शेतकरी,अशोक सुदाम मुटकुळे — आदर्श युवा उद्योजक,श्री. बाळासाहेब बोडखे — उत्कृष्ट बांधकाम व्यवसायिक,अनिल आंधळे — आदर्श चार्टर्ड अकाउंटंट,प्रवीण वारे — आदर्श युवा उद्योजक,अॅड. श्री. रत्नदिप निकाळजे — आदर्श विधिज्ञ,संदीप शिंदे — आदर्श पशुवैद्यकीय अधिकारी, अवित घोलप — आदर्श बांधकाम इंजिनिअर,अशोक कोरडे — आदर्श प्राध्यापक, प्रेमकुमार तावरे — आदर्श मेडिकल युवा उद्योजक, बाबासाहेब पवार — आदर्श समाजसेवक शिक्षक नेता,सुखदेव पोकळे — दिव्यांग व अनाथालय पीडीतग्रस्त आदर्श संस्था चालक, विजय मेहेर — आदर्श सोने-चांदी उद्योजक, सुभाष चौरे — आदर्श पत्रकारिता,सूर्यकांत नेटके — आदर्श पत्रकारिता, संतोष आमले — आदर्श संपादक, अजय कापरे — आदर्श समाजसेवक / उद्योजक,योगेश दाणी — आदर्श रुग्ण समाजसेवक, रवी सातसाई — आदर्श प्राध्यापक, सुधाकर राठोड — आदर्श मुख्याध्यापक, अॅड. श्री. विकास आजबे — आदर्श युवा विधिज्ञ, भगवान शिनगिरे — आदर्श समाजसेवक, विश्वनाथ राजाभाऊ खेंगरे — आदर्श ग्रामसेवक, शिवराज संजय सोले — उत्कृष्ट सेपाकटकराॅ राष्ट्रीय खेळाडू,शहाजी कोकणे — आदर्श प्रगतशील शेतकरी, अतिक शेख — आदर्श एल.आय.सी. सल्लागार, बबन शिंदे — आदर्श समाजसेवक,मोहसिन पठाण — आदर्श वाहन विमा सल्लागार, तुषार दिलीप नाथ — उत्कृष्ट इंटेरियर डिझायनरसंजय तुपे — आदर्श संगीत अलंकार,प्रीता प्रमोद नागरे — आदर्श बालकलाकार,राणी दरंदले — आदर्श निवेदिका,शहादेव पालवे — आदर्श पोलीस अधिकारी,डॉ. विष्णु साबळे — आदर्श पशुधन विकास अधिकारी,भाऊसाहेब विठ्ठल खाडे — आदर्श युवा उद्योजक,ह.भ.प. अशोक महाराज भोळे — आदर्श वारकरी भूषण हे मान्यवर महाराष्ट्र आयकॉन्स 2026 पुरस्काराने होणार सन्मानित.