lumpy death in asthi

ताज्या बातम्या

lumpy death in asthi लंपी आजाराने आष्टी तालुक्यात आतापर्यंत 94 जनावरांचा मृत्यू

By admin

December 26, 2022

लंपी आजाराने आष्टी तालुक्यात इतक्या जनावरांचा मृत्यू

आष्टी

आष्टी तालुक्यात लंपी रोगाचा कहर वाढला आहे .शनिवारी तालुक्यातील  11 जनावरांचा लंपीच्या आजाराने मृत्यू झाला.

आतापर्यंत आष्टी तालुक्यात 94 जनावरांचा मृत्यू झाला आहे . आज आष्टी तालुक्यात बरे झालेल्या जनावरांची संख्या ४३२७ इतकी आहे. तालुक्यातील १२२ गावे या आजाराने बाधित झाले आहेत. आजपर्यंत ५७१२ जनावरे लम्पी आजाराने बाधित झाले आहेत.

लंपी आजार सुरु झाल्यापासून् बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यात सर्वाधिक जनावरे  बाधित होण्याचे प्रमाण वाढले आहे.मात्र त्या प्रमाणात उपचार होताना दिसत नाहीत.तालुका पशुसंवर्धन विभागाच्या वतीने लसीकरण सुरु आहे. मात्र लंपी रोगाचा प्रादुर्भाव कमी होताना दिसत नाही .

आष्टी तालुक्यातील फत्तेवडगाव  येथे 1,गांधनवाडी 1, डोंगरगण  1, कोल्हेवाडी  1, जामगाव 2 टाकळसिंग 2 ,कोयाळ 1 ., पिंपरी घुमरी 1 आणि आणखी  एका जनावराचा लंपी आजाराने मृत्यू झाला.