lumpy death in ahmednagar

ताज्या बातम्या

चार दिवसात अहमदनगर जिल्ह्यात लम्पी आजाराने 228 जनावरांचा मृत्यू

By admin

November 14, 2022

lumpy death in ahmednagar चार दिवसात अहमदनगर जिल्ह्यात लम्पी आजाराने 228 जनावरांचा मृत्यू

 

अहमदनगर

lumpy death in ahmednagar  जिल्ह्यामध्ये लम्पी ( lumpy disease in animals ) आजाराने जनावरे मरण्याचे प्रमाण वाढत आहे. दररोज ही संख्या 50 ते 60 दरम्यान आढळून येत आहे. गेल्या चार दिवसांमध्ये 228 जनावरांचा मृत्यू झाला.( lumpy death in ahmednagar today )

 

अहमदनगर जिल्ह्यामध्ये या लम्पी आजाराचा  विळखा वाढत असल्याचे चित्र दिसत आहे.( lumpy death in ahmednagar today news ) जिल्ह्यामध्ये 220 गावे आतापर्यंत बाधित झाले असून 27513 पशुधन हे हे लंबी आजाराने बाधित झाले आहे तर लंबी आजारातून बरे होणाऱ्या पशुधनाची संख्या 18278 इतकी आहे.आतापर्यंत जिल्ह्यात एकूण 14 लाख 19 हजार 205 जनावरांचे लसीकरण करण्यात आल्याची माहिती पशुसंवर्धन विभागाने दिली आहे .

१० नोव्हेंबर पर्यंत जिल्ह्यातील पंधराशे जनावरांचा मृत्यू झाल्याचा आकडा होता.त्यानंतर गेल्या चार दिवसांमध्ये 228 मृत जनावरांची यामध्ये भर पडली.

दररोज मृत होण्याचे प्रमाण सरासरी 50 ते 60 इतके आहे.गेल्या दोन दिवसांपूर्वी दररोज 64 जनावरे मृत्यू ( lumpy disease in cattle) झाल्याचे पुढे आले आहे.पशुसंवर्धन विभागाच्या माध्यमातून जिल्ह्यातील सर्व सर्व जनावरांची लसीकरण करण्यात येत असून बाधित असलेल्या जनावर जनावरांची काळजी घेण्यात येत आहे.