ताज्या बातम्या

नीट पेपर फुटी प्रकरणात लातूरच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यात चौघांवर गुन्हा दाखल, दोन शिक्षकांना अटक

By admin

June 24, 2024

लातूर

Latur two teachers have been arrested in the case of NEET paper leakage वैद्यकीय प्रवेश परीक्षेच्या अर्थात (नीट) पेपरफुटी प्रकरणाचे धागेदोरे हे लातूरपर्यंत पोहोचल्याचे उघड झालं आहे. याप्रकरणी नांदेडच्या एटीएस च्या पथकाने पेपर फुटी प्रकरणातील संशयावरून शनिवारी रात्री संजय तुकाराम जाधव आणि जलील उमरखाँ पठाण या दोघांना ताब्यात घेऊन रविवारी नोटीस देऊन सोडून दिलं होतं.

मात्र रविवारी सायंकाळी संजय तुकाराम जाधव आणि जलील उमरखाँ पठाण या जिल्हा परिषद शाळेत शिक्षक असणाऱ्या दोघांना अटक करण्यात आली. तसेच इरन्ना मष्णाजी कोनगलवार आणि दिल्ली येथील गंगाधर (पूर्ण नाव नाही) अशा एकूण चौघांवर लातूरच्या शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

या चौघांविरोधात लातूरच्या The Public Examinations (Prevention of Unfair Means) Act 2024 चे कलम 3(v), 4 व 10 सह कलम ४२०, १२० (ब) भारतीय दंड सहिंता अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेषबाब म्हणजे या संपूर्ण प्रकरणाचा तपास करण्यासाठी लातूर शहरचे उपविभागीय पोलीस अधिकारी भागवत फुंदे यांच्या नेतृत्वाखाली एका एसआयटी ची स्थापना करण्यात आली आहे. तसेच पुढील तपास केला जात आहे. दरम्यान या संपूर्ण प्रकरणामुळे लातूरच्या शैक्षणिक लातूर पॅटर्नची प्रतिमा डागळली असून याप्रकरणात आणखी काही जणांची नावं पुढे येतील अशी शक्यता वर्तवली आहे.