kisan andolan beed

ताज्या बातम्या

किसान सभेने अर्थ संकल्प निषेधार्थ काळा दिवस पाळला

By admin

February 09, 2023

 

परळी / प्रतिनिधी

kisan andolan beed  २०२० खरीप पीक विम्यासंदर्भात शेतकऱ्यांच्या तक्रारींची सुनावणी तात्काळ पूर्ण करण्यात यावी आणि शेतकरी खर्चावर केंद्रीय अर्थ संकल्पना कमी तरतून केल्याच्या निषेधार्थ गुरुवार दि 9 रोजी अखिल भारतीय किसान सभा बीड आणि शेतकरी, शेट मजूर युनियनच्या वतीने परळी तालुक्यातील सिरसाळा येथे धरणे आंदोलन करून काळा दिवस पाळण्यात आला.

सन 2020 च्या पिक विमा संदर्भात तक्रार निपटारा करून तालुक्यातील शेतकऱ्यांना पिक विमा मिळण्याचा मार्ग सुरळीत करण्यात यावा याकडे प्राथमिक स्तरावरील पिक विमा संदर्भातील तालुका तक्रार निवारण कमिटी दुर्लक्ष करीत असल्याचा सांगत सोमवार दि 13 फेब्रुवारी पासून तालुका पीक विमा तक्रार निवारण समिती स्तरावर सुनावणी पूर्ण होत नाही तोपर्यंत

बेमुदत धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा दिला आहे.तसेच केंद्रातील मोदी सरकारने सादर केलेला 2023-24 चा अर्थसंकल्प शेतकरी, शेतमजूर व कामगारांच्या हक्कावर घाला घालत शेतकरी खर्चावर अर्थ संकल्पात कमी तरतूद करीत श्रमिक विरोधी व कॉर्पोरेट धार्जिना या सादर केलेल्या अर्थ संकल्पाचा निषेध गुरुवार दि.9 फेब्रुवारी रोजी निदर्शने

करुन या निषेधार्त किसान सभा ,शेतकरी, शेत मजूर युनियन कडून हा देशव्यापी काळा दिवस पाळला. आंदोलनकर्त्यांचे निवेदन प्रशासनाच्यावतीने सिरसाळा ग्रामीण पोलीस ठाण्याचे सपोनि दहिफळे यांनी स्वीकारले.

सिरसाळा येथील भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौकात संपन्न झालेल्या या निदर्शने आंदोलन किसान सभेचे कॉ.गंगाधर पोटभरे, कॉ.बालाजी कडभाने, कॉ.विष्णू देशमुख,कॉ.प्रवीण देशमुख ,कॉ.बाबूराव देशमुख,कॉ.विशाल देशमुख यांच्यासह शेतमजूर युनियनचे जिल्हाध्यक्ष कॉ.सुदाम शिंदे, कॉ.मदन वाघमारे, कॉ.बाबा शेरकर,कॉ.इस्माईल शेख,कॉ.बळीराम देशमुख,कॉ.अंकुश उबाळे यांच्यासह असंख्य शेतकरी, शेतमजूर या प्रसंगी उपस्थित होते.