ताज्या बातम्या

Khashaba jadhav kusti खाशाबा जाधव चषक कुस्ती स्पर्धांचा समारोप

By admin

February 24, 2023

Khashaba jadhav kusti खाशाबा जाधव चषक कुस्ती स्पर्धांचा समारोप

धुळे –

Khashaba jadhav kusti क्रीडा व युवक संचालनालय, पुणे आणि महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या संयुक्त विद्यमाने धुळे येथील गरुड मैदानावर आयोजित राज्यस्तरीय स्व. खाशाबा जाधव चषक कुस्ती स्पर्धेचा शुक्रवारी सायंकाळी समारोप झाला.

तीन दिवस सुरू असलेल्या या स्पर्धेत फ्री स्टाईल, ग्रीको रोमन, महिला संघ या तीन प्रकारात आणि विविध दहा वजनी गटात या स्पर्धा झाल्या. या स्पर्धेसाठी राज्यभरातून 30 संघ आणि  650 पेक्षा अधिक कुस्तीपटू, प्रशिक्षक सहभागी झाले होते. या स्पर्धेसाठी गरूड मैदानावर तीन मॅटचे आखाडे तयार करण्यात आले होते, तर स्पर्धेच्या यशस्वितेसाठी विविध समित्या गठित करण्यात आल्या होत्या. 19 वर्षाच्या प्रदीर्घ कालावधीनंतर धुळ्यात या स्पर्धा होत असल्याने धुळेकरांनी कुस्तीचा आनंद घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.

धुळ्यात होत असलेल्या स्व. खाशाबा जाधव चषक कुस्ती स्पर्धेत फ्री स्टाईल प्रकारात 92 किलो वजनगटात पुणे जिल्हा चा अभिजीत भोईर याने धुळ्याचा द्रविड आघाव वर मात करून सुवर्ण पदक मिळविले. तर आघाव यास रौप्य पदक मिळाले.

धुळे येथे सुरू असलेल्या स्व. खाशाबा जाधव चषक राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेत  55 किलो वजनगट महिला धुळ्याची साक्षी शिंदे हिने नगरच्या चैताली वर मात करून कास्य पदक मिळविले.

या स्पर्धेच्या आयोजनासाठी धुळे महानगरपालिका, जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींसह सामाजिक संस्थांचे आर्थिक  सहाय्य लाभले. या स्पर्धेत ग्रिकोरोमन प्रकारात 67 किलो वजनी गटात धुळ्याच्या रोहित शिंदे ला कास्य पदक, महिला प्रकारात 55 किलो वजनी गटात साक्षी शिंदेला कास्य पदक तर फ्री स्टाईल प्रकारात 74 किलो वजनगटात जतीन आवाळेला सुवर्ण पदक, 61 किलो वजनी गटात नाबील शहा ला रौप्य पदक, 92 किलो वजनगटात द्रविड आघावला रौप्य पदक तर 79 किलो वजनगटात प्रशांत फटकाळला कास्य पदक मिळाले आहेत. या स्पर्धेच्या यशस्वितेसाठी धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांचे  मार्गदर्शन लाभले.