kanda

ताज्या बातम्या

कांद्याने घेतला शेतकऱ्याचा जीव?

By admin

March 19, 2023

 

आष्टी

 

kanda हा कधी शेतकऱ्यांना श्रीमंत बनवतो तर कधी भिकारी.गेल्या काही दिवसापासून कांद्याचे पडते भाव पाहता kanda utpadak  शेतकऱ्यांना कांदा हे पीक नकोसे वाटू लागले आहे.

मात्र उत्पादित केलेल्या कांद्याचे करायचे काय हाही प्रश्न शेतकऱ्यांसमोर आहे. तर कांद्याला योग्य भाव न मिळाल्याने कर्ज कसे फेडायचे या विवंचनेतून शेतकऱ्याने आत्महत्या केल्याची घटना अंभोरा येथे घडलीय.

आष्टी तालुक्यातील अंभोरा येथील कांदा उत्पादक शेतकऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शनिवारी घडली . अंभोरा येथील शेतकरी कांतीलाल नारायण गवळी वय ४२ वर्षे या कांदा उत्पादक शेतकर्‍याने शनिवारी पहाटेच्या सुमारास वस्तीवरील घराच्या पाठीमागे असलेल्या आंब्याच्या झाडाला गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली.

काही दिवसांपूर्वी त्याने कांदा मार्केटला ३०० गोण्या कांदा विक्रीसाठी नेला होता मात्र समाधानकारक भाव न मिळाल्याने व कर्ज कसे फेडायचे या नैराश्यातुन त्याने आत्महत्या केल्याचे बोलले जाते .

कांदा लागवडीसाठी त्याने स्थानिक पतसंस्थेकडून ४ लाख रुपयांचे कर्ज घेतले होते . मात्र पुरेसे उत्पन्न न झाल्याने त्याने नैराश्यातुन आत्महत्या केली . अंभोरा पोलीसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला व शवविच्छेदनासाठी मृतदेह सुलेमान देवळा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठविण्यात आला आहे.

आता या कांद्याचे उत्पन्न घ्यावे कि नाही हा प्रश्न शेतकऱ्यांना भेडसावत आहे.