ताज्या बातम्या

यात्रेत पाळणा निखळला आणि काळजाचा ठोका चुकला

By admin

April 01, 2023

यात्रेत पाळणा निखळला आणि काळजाचा ठोका चुकला

शिर्डी

शिर्डी येथील रामनवमी यात्रेनिमित्त प्रसादालयासमोर भरविण्यात आलेल्या जत्रेतील जमिनीवरील फिरता पाळणा Jaint wheel accident निखळून झालेल्या दुर्घटनेत चार जण जखमी झाले. असून एकाची प्रकृती गंभीर आहे.

शनिवार, १ एप्रिल रोजी सायंकाळी ८.३० वाजता ही घटना घडली. या घटनेत चार जण जखमी झाले आहेत‌. Giant wheel ज्योती किशोर साळवे, किशोर पोपट साळवे यांना अतिदक्षता कक्षात दाखल करण्यात आले आहे ‌. भुमिका साबळे‌ ही किरकोळ जखमी असून प्राथमिक उपचारानंतर तिला घरी पाठविण्यात आले.

प्रविण आल्हाट यांना‌ही किरकोळ जखमी झाले आहेत. श्री. साईबाबा रूग्णालयातील वैद्यकीय उपसंचालक डॉ.प्रितम वडगावे यांच्या देखरेखीखाली जखमींवर उपचार सुरू आहेत. राज्याचे महसूलमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, खासदार सदाशिवराव लोखंडे व खासदार डॉ. सुजय विखे-पाटील यांनी  शिर्डी प्रांताधिकारी गोविंद शिंदे, तहसीलदार कुंदन हिरे यांच्याकडून दूरध्वनीवरून घटनेची माहिती घेतली आहे. पालकमंत्र्यांनी डॉ.प्रितम वडगावे यांच्याशीही दूरध्वनीवरून संवाद साधला असून जखमींवर तातडीने उपचार करण्याच्या सूचनाही  दिल्या आहेत. Big wheel पाळणा निखळून पडण्याच्या घटनेनंतर सर्व पाळणे बंद‌ करण्यात आले असल्याचे ही प्रशासनाकडून कळविण्यात आले आहे.