वॉशिंग्टन / तेहरान –इराणचे नवे सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई अलीकडील लष्करी हल्ल्यांमध्ये जखमी झाले असून त्यांचा चेहरा विद्रूप झाला असण्याची शक्यता आहे, असा दावा अमेरिकेचे संरक्षण सचिव पीट हेगसेथ यांनी केला आहे.
पेंटागॉनमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत हेगसेथ म्हणाले की, खामेनेई यांनी सर्वोच्च नेतेपद स्वीकारल्यानंतर अद्याप सार्वजनिकरीत्या हजेरी लावलेली नाही. त्यामुळे त्यांच्या प्रकृतीबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत.
इराणच्या सरकारी माध्यमांनी खामेनेई यांच्या नावाने लेखी निवेदन प्रसिद्ध केले असले तरी त्यांनी व्हिडिओ किंवा ऑडिओ संदेश दिलेला नाही. यामुळे त्यांच्या आरोग्याबद्दल अधिक चर्चा सुरू झाली आहे.
दरम्यान, इराण-इस्रायल-अमेरिका संघर्षामुळे मध्य पूर्वेतील तणाव वाढत असून लष्करी कारवाया आणि क्षेपणास्त्र हल्ले सुरूच आहेत.