Inspection of Kurduwadi – Latur Section by Railway Divisional Manager मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागाचे, रेल्वे विभागीय व्यवस्थापक श्री. नीरज कुमार दोहारे यांच्या कडून कुर्डुवाडी – लातूर सेक्शनचे निरीक्षण करण्यात आले. सोलापूर विभागाला मिळालेल्या नवीन spic (परख) निरीक्षण व्हॅन उदघाटन करून सोलापूर – कुर्डुवाडी सेक्शनचे विंडो ट्रेलिंग निरक्षण केले.
कुर्डुवाडी रेल्वे स्थानकावर ‘अमृत स्टेशन योजना’ अंतर्गत कामाची पाहणी केली आणि रेल्वे लाईनचे निरीक्षण केले.कुर्डुवाडी – लातूर सेक्शनचे निरीक्षणच्या वेळी, सेक्शन मधील सर्व RUB (रोड अंडर ब्रिज) ची पाहणी केली. लातूर रेल्वे स्थानकावर ‘अमृत स्टेशन योजना’ अंतर्गत कामाची पाहणी केली आणि नवीन पीट लाईनचे भूमी पूजन केले.
यावेळी वरिष्ठ विभागीय अभियंता (समन्वय) श्री.चंद्रभूषण, वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक श्री.योगेश पाटील, वरिष्ठ विभागीय परिचालन व्यवस्थापक श्री.जे एन गुप्ता, विभागीय अभियंता (मध्य) श्री.रवींद्र सिंगल, वरिष्ठ विभागीय विद्युत अभियंता (टिआरडी) श्री. अनुभव वार्ष्णेय, वरिष्ठ विभागीय विद्युत अभियंता (जनरल) श्री. अभिषेक चौधरी, वरिष्ठ विभागीय यांत्रिकी श्री. प्यासे या प्रमुख अधिकाऱ्यांच्या समावेत अन्य रेल्वे कर्मचारी उपस्थित होते.