ताज्या बातम्या

माजी आमदार भीमराव धोंडे यांना 1 कोटींची खंडणी मागितली

By admin

June 29, 2024

अहमदनगर

honey trap Ex-MLA Bhimrao Dhonde demanded a ransom of 1 crore आष्टी येथील माजी आमदार भीमराव आनंदराव धोंडे यांना अश्लील व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत तब्बल 1 कोटी रुपयांच्या खंडणीची मागणी करण्यात आली. या प्रकरणी अहमदनगर येथील 2 महिलांसह 3 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींत एका पत्रकाराचा समावेश आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,आष्टी चे माजी आमदार भीमराव आनंदराव धोंडे यांना अश्लील व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत 1 कोटी रुपयांच्या खंडणीची मागणी करण्यात आली. हा गुन्हा जानेवारी ते 26 जून दरम्यान हॉटेल रॉयल येथे घडली. या प्रकरणी नगरमधील गायकवाड व बांगर (पूर्ण नाव समजले नाही) या 2 महिलांसह इस्माईल दर्यानी उर्फ भैया बॉक्सर नामक एका यूट्यूब पत्रकाराविरोधात कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

प्रस्तुत आरोपींनी संगनमत करून आमच्याकडे फिर्यादीची अश्लील व्हिडिओ क्लिप आहे. ती सोशल मीडियावर व्हायरल करून तुमची बदनामी करू. तसेच तुमच्या विरोधात अत्याचाराचा गुन्हा देखील दाखल करून तुमचे राजकीय कारकीर्द संपून टाकू, अशी धमकी देत 1 कोटी रुपयांची खंडणी मागितली. यातील 25 हजार रुपये माजी आमदार धोंडे यांचे स्वीय सहाय्यक जफर शेख यांच्याकडून इस्माईल दर्याने उर्फ भैया बॉक्सर यांनी स्वीकारले आहेत, असे माजी आमदार धोंडे यांनी आपल्या फिर्यादीत म्हटले आहे.

दरम्यान धोंडे यांना honey trap मध्ये अडकून हा प्रकार केला असावा. यासंदर्भात ते पोलीस तपासात पुढे येईल.