hingoli parbhani earthquake 2026

ताज्या बातम्या

hingoli parbhani earthquake 2026 भीतीपोटी नागरिकांनी जागून काढली संपूर्ण रात्र

By admin

July 09, 2026

हिंगोली जिल्हा भूकंपाच्या तीव्र धक्क्याने हादरला!४.६ रिश्टर स्केलची नोंद;

हिंगोली

hingoli parbhani earthquake 2026 जिल्ह्यात गुरुवारी पहाटे भूकंपाच्या धक्याची मालिका नागरिकांमध्ये भिती आणि दहशत पसरवणारी होती. 1:37 वाजता दोन सलग आणि अत्यंत तीव्र धक्के बसले. रिश्टर स्केलवर या भूकंपाची तीव्रता ४.६ इतकी मोजली गेली असून, हा या भागातील आतापर्यंतचा सर्वात मोठा धक्का मानला जात आहे. पुन्हा 2:15 वाजता आणि 2:17 वाजता भूकंपाचे धक्के बसले.अचानक आलेल्या या संकटामुळे घाबरलेले नागरिक जीवाच्या आकांतातून घराबाहेर धावले. अनेक गावांमध्ये घरांना तडे गेल्याची माहिती असून, नागरिकांनी संपूर्ण रात्र जागून काढली आहे.प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी पहाटे १:३५ आणि १:३७ वाजण्याच्या सुमारास अवघ्या दोन मिनिटांच्या अंतराने हे सलग दोन धक्के जाणवले.तर 2:15 व 2:17 वाजता पुन्हा धक्के जाणवले.या भूकंपाचा मुख्य केंद्रबिंदू वसमत तालुक्यातील पांगरा शिंदे हे गाव होते. धक्का इतका मोठा होता की, जमिनीतून प्रचंड आवाजासह घरे आणि भांडी हालू लागली. यामुळे पांगरा शिंदे गावासह तालुक्यातील बहुतांश गावांमधील नागरिक गाढ झोपेतून दचकून जागे झाले आणि त्यांनी उघड्या मैदानाकडे धाव घेतली.त्यांनतरही ही मालिका सूरूच होती.2:48 वा सातवा धक्का ,2:50 आठवा धक्का बसला.