सुरेश पाटील,
माहिती अधिकारी, उपमाहिती कार्यालय, शिर्डी.
har ghar tiranga 2022 भारतीय स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण होत आहेत. देशभर “स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव” उत्साहात व जल्लोषात साजरा करण्यात येत आहे. भारतीय स्वातंत्र्यलढ्याच्या स्मृती तेवत राहाव्यात, देशभक्तीची जाज्वल्य भावना कायमस्वरूपी मनात राहावी व त्याचे संस्मरण व्हावे, या उद्देशाने 13 ते 15 ऑगस्ट 2022 या कालावधीमध्ये देशभरात “घरोघरी तिरंगा” हा उपक्रम राबविण्यात येणार आहे.
या कालावधीत प्रत्येक शासकीय, निमशासकीय व खाजगी आस्थापनांवर तसेच प्रत्येक घर व इमारतींवर स्वयंस्फूर्तीने राष्ट्रध्वजाची उभारणी करायची flag hoisting ceremony आहे. भारताची आन, बान व शान असलेला तिरंगा झेंडा प्रत्येक घरावर डौलानं फडकणार आहे. राष्ट्रध्वज फडकावितांना त्याचा कुठेही अनादर होणार नाही.
अवहेलना होणार नाही. त्याचा सन्मान राखला जाईल. त्यांची योग्य ती निगा ठेवत आदर करत फडकाविला जाईल. याची काळजी ही नागरिकांना घ्यावयाची आहे. तेव्हा राष्ट्रध्वजाचा सन्मान, आदर राखतांना काय काळजी घेतली पाहिजे ? योग्य ध्वज फडकाविण्याचे नियम/संहिता काय आहे ? ध्वजसंहितेत काय बदल झाले आहेत ? याबद्दल जाणून घेणे प्रत्येक भारतीय नागरिकांचे कर्तव्य आहे.
इंग्रजांनी 24 मार्च 1947 रोजी भारत सोडून जाण्याचा निर्णय जाहीर केला. तेव्हा भारतीय नेत्यांनी ‘स्वतंत्र भारताचा’ ध्वज कसा असावा हे ठरविण्यासाठी तातडीने एक समिती नेमली गेली. त्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रभृती होते. त्यांनी ठरवले की काँग्रेसचा ध्वज हाच स्वतंत्र भारताचा ध्वज म्हणून घोषित करावा, फक्त चरख्याऐवजी अशोकचक्र हे चिन्ह ध्वजाच्या मध्यभागी विराजमान व्हावे.
घटना समितीने 22 जुलै 1947 या दिवशी ठरावाला मंजुरी दिली.
भारताचा राष्ट्रीय ध्वज हा भगवा (केशरी), पांढरा आणि हिरवा असा क्षैतिज आयताकृती तिरंगा आहे. त्याच बरोबर अशोकचक्र, त्याच्या मध्यभागी आहे. भारतीय राष्ट्रध्वज (तिरंगा) 22 जुलै 1947 रोजी, भारत देशाला स्वातंत्र्य मिळण्याच्या 24 दिवस आधी अंगीकारला गेला. आणि 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वतंत्र भारताचा अधिकृत राष्ट्रीय ध्वज तिरंगा झाला. हा देश स्वतंत्र करण्यासाठी हजारो देशभक्तांनी आपल्या प्राणाची आहुती दिली आहे.
हजारो लोकांनी आपल्या घरावर तुळशीपत्र ठेवून, लाठ्या, काठ्या खाऊन, जेलमध्ये अनंत यातना सहन करून या देशाच्या स्वातंत्र्यासाठी आपले देह झिजवले आहेत. त्यांच्या बलिदानाचे, त्यांच्या त्यागाचे, राष्ट्राभिमानाचे प्रतिक आपला तिरंगा आहे.
Har ghar tiranga certificate download now
राष्ट्रध्वजाचा सन्मान राखला जावा यासाठी भारतीय राज्यघटनेच्या मुलभूत कर्तव्याचे कलम 51 (अ) मध्ये “संविधानाचे पालन करणे, त्यांचे आदर्श आणि संस्था, राष्ट्रध्वज आणि राष्ट्रगीत याचा आदर करणे भारतातील प्रत्येक नागरिकांचे कर्तव्य आहे.” असे नमूद केले आहे.
मात्र मुलभूत कर्तव्याचे पालन करणे नागरिकांवर बंधनकारक नाही. मुलभूत कर्तव्याचे पालन केले नाही तर कार्यवाही होत नाही. राष्ट्रध्वजाबद्दल सार्वत्रिक प्रेम व आदर आहे आणि त्याच्याप्रती सर्वाची निष्ठा आहे. तरी सुद्धा राष्ट्रध्वज लागू करण्याकरीता लागू असलेले कायदे, प्रथा व संकेत यासंबंधात केवळ लोकांमध्येच नव्हे, तर शासकीय संघटना, अभिकरणे यामध्येसुद्धा कित्येकदा जाणिवेचा स्पष्ट अभाव दिसून आलेला आहे.
ही बाब लक्षात घेता ‘तिरंगा’ चा आदर व सन्मान राखण्यासाठी प्रतीक व नावे (अयोग्य वापर प्रतिबंध) कायदा 1950 व राष्ट्रीय सन्मानाचा अपमान प्रतिबंधक कायदा 1971 आणण्यात आले. या कायद्यानुसार राष्ट्रध्वजाचा अपमानासाठी शिक्षा ठरविण्यात आली.
मात्र या नियमांच्या अंमलबजावणीसाठी व्यापक स्तरावर स्वतंत्र कायदा/संहितेची गरज होती. यासाठी केंद्र शासनाने 2002 मध्ये ध्वजसंहिता तयार केली. भारतीय ध्वजसंहिता 2002 मध्ये याबाबतचे सर्व कायदे, संकेत, प्रथा व सूचना एकत्रित करण्याचा एक प्रयत्न केला आहे.
भारतीय ध्वजसंहिता 2002 – तीन भागांमध्ये विभागणी करण्यात आली आहे. संहितेच्या भाग एकमध्ये राष्ट्रध्वजाच्या सर्वसाधारण वर्णनाचा समावेश आहे. संहितेच्या भाग दोनमध्ये जनतेतील कोणतीही व्यक्ती, खासगी संघटना, शैक्षणिक संस्था आदींना राष्ट्रध्वज लावण्याबाबत माहिती दिली आहे.
संहितेचा भाग तीन हा केंद्र सरकार व राज्य सरकारे संघटना व अभिकरणांनी राष्ट्रध्वज लावण्यासंबंधातील आहे.
तिरंगा ध्वजाची रचना – भारतीय राष्ट्रध्वज तीन रंगांच्या पट्ट्यांचा असून तो समान रुंदीच्या तीन आयताकृती पट्ट्या किंवा जोडपट्ट्यांचा मिळून बनलेला असेल. सर्वांत वरची पट्टी केशरी रंगाची असेल, खालची पट्टी हिरव्या रंगाची, तर मधली पट्टी पांढऱ्या रंगाची असेल. तिच्या मध्यभागी समान अंतराच्या 24 आऱ्यांचे नेव्ही ब्ल्यू रंगाचे (Navy Blue) अशोक चक्राचे चिन्हं असेल.
अशोक चक्र हे विशेष करून स्क्रिन प्रिंट केलेले किंवा अन्य प्रकारे प्रिंट केलेले किंवा स्टेन्सिल केलेले अथवा योग्यरीतीने भरतकाम केलेले असेल आणि ते ध्वजाच्या दोन्ही बाजूंनी पांढऱ्यापट्टीच्या मध्यभागी पूर्णतः दिसेल असे असेल.
भारतीय राष्ट्रध्वज हाताने कातलेल्या व हाताने विणलेल्या लोकर, सूत, सिल्क, खादी कापडापासून बनविलेला असावा. राष्ट्रध्वज आयताकृती आकाराचा आहे. ध्वजाची लांबी व उंची (रुंदी) यांचे प्रमाण 3 : 2 एवढे असावे.
ध्वज लावण्यासाठी त्याचा योग्य तो आकार निवडणे आवश्यक आहे. 450 X 300 मि. मि. आकाराचे ध्वज अति विशेष मान्यवर व्यक्तींच्या विमानांकरीता आहेत. 225 X 150 मि. मि.
आकाराचे ध्वज मोटारगाड्यांवर लावण्याकरीता आहेत. 150 X 100 मि.मि. आकाराचे ध्वज टेबलवर लावण्याकरीता आहेत.
indian flag hoisting time rules
राष्ट्रध्वजाचा आदर – ध्वजसंहिता 2002 नुसार कोणत्याही व्यक्ती, खासगी संघटना, शैक्षणिक संस्था इत्यादीना राष्ट्रध्वज लावण्याबाबत कोणतेही निर्बंध नाहीत. वाणिज्यिक प्रयोजनासाठी ध्वजाचा वापर करता येणार नाही. कोणत्याही व्यक्तीस किंवा वस्तूस मानवंदना देण्यासाठी ध्वज खाली आणता येणार नाही.
कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी किंवा कोणत्याही अन्य ठिकाणी लोकांच्या समोर भारतीय राष्ट्रध्वज किंवा त्याचा कोणताही भाग जाळील, छिन्नविच्छिन्न करील, विरूप करील, त्याचे पावित्र्य विटाळील, तो विद्रुप करील, नष्ट करील, पायाखाली तुडवील किंवा अन्यथा त्याची बेअदबी करील (मग ती तोंडी किंवा लेखी शब्दाद्वारे असो वा कृती द्वारे असो) त्याला तीन वर्षापर्यंत असू शकेल इतक्या मुदतीचा कारावास किंवा द्रव्य दंड किंवा दोन्ही शिक्षा आहेत.
har ghar tiranga 2022 राष्ट्रध्वज फडकावताना कोणत्या गोष्टी ध्यानात घ्याव्यात ?
राष्ट्रध्वजाचा कुठे वापर करून नये – खासगी अंत्यसंस्कारासह जे कोणतेही असेल, अशा कोणत्याही स्वरूपातील आच्छादन म्हणून ध्वजाचा वापर करता येणार नाही.
ध्वजाचा कोणत्याही प्रकारच्या पोशाखाचा अथवा गणवेशचा भाग म्हणून वापर करता येणार नाही किंवा त्याचे उशा, हातरुमाल, हात पुसणे यावर किंवा कोणत्याही पोशाख साहित्यावर भरतकाम करता येणार नाही किंवा छपाई करता येणार नाही. ध्वजावर कोणत्याही प्रकारची अक्षरे लिहिता येणार नाहीत.
ध्वजाचा कोणतीही वस्तू घेण्याचे, देण्याचे किंवा वाहून नेण्याचे साधन म्हणून वापर करता येणार नाही. मात्र, विशेष प्रसंगी आणि प्रजासत्ताक दिन व स्वातंत्र्य दिनासारख्या राष्ट्रीय दिनी तो साजरे करण्याचा एक भाग म्हणून ध्वज फडकविण्यापूर्वी ध्वजाच्या आतील भागात फुलांच्या पाकळ्या ठेवण्यास कोणतीही हरकत असणार नाही.
ध्वजाचा आच्छादन म्हणून वापर करता येणार नाही – एखाद्या पुतळ्याच्या अनावरणप्रसंगी ध्वजाचा वापर करण्यात येईल तेव्हा तो सुस्पष्टपणे व वेगळा दिसेल, अशा प्रकारे लावावा.
त्याचा पुतळा किंवा स्मारकाचे आवरण म्हणून वापर करता येणार नाही. ध्वजाचा वक्त्याचा टेबल झाकण्यासाठी वापर करता येणार नाही किंवा वक्त्याच्या व्यासपीठावर आच्छादता येणार नाही.
ध्वजाचा जाणीवपूर्वक भूमीशी किंवा जमिनीशी स्पर्श होवू देवू नये किंवा तो पाण्यावरून फरफटत नेवू नये. ध्वज मोटार वाहने, रेल्वे गाडी, जहाज किंवा विमानाच्या झडपावर, छतावर, बाजूंवर किंवा पाठिमागच्या बाजूस आच्छादता येणार नाही.
ध्वजाच्या एखाद्या इमारतीचे आच्छादन म्हणून वापर करता येणार नाही आणि ध्वजाचा केशरी रंगाचा पट्टा खालच्या बाजूस येईल, अशा प्रकारे जाणीवपूर्वक ध्वज लावता येणार नाही.
flag hoisting time राष्ट्रध्वज फडकाविण्याच्या पध्दत -tiranga flag hoisting style जेव्हा एखाद्या वक्त्याच्या व्यासपीठावर ध्वज लावायचा असेल तेव्हा वक्त्याचे तोंड श्रोत्यांकडे असताना त्याच्या उजव्या बाजूकडे ध्वज लावण्यात यावा किंवा वक्त्याच्या पाठीमागे लावताना तो भिंतीवर वक्त्याच्या पाठिमागे वरच्या बाजूला लावावा.
जेव्हा ध्वज भितीवर सपाट व आडवा लावला असेल तेव्हा ध्वजातील केशरी रंगाचा पट्टा सर्वात वर असावा आणि जेव्हा ध्वज उभा लावण्यात आला असेल तेव्हा ध्वजातील केशरी रंगाचा पट्टा ध्वजाच्या उजव्या बाजूस असावा (म्हणजे ध्वजाकडे तोंड करून उभ्या असलेल्या व्यक्तीच्या डाव्या बाजूस असावा) राष्ट्रध्वजापेक्षा उंच किंवा राष्ट्रध्वजाच्या वर किंवा त्याच्याबरोबरीने अन्य कोणताही ध्वज किंवा पताका लावू नये, तसेच ज्या काठीवर ध्वज फडकवत ठेवला असेल त्या काठीवर किंवा त्या काठीच्या वरच्या टोकावर फुले किंवा हार यासह कोणतीही वस्तू ठेवू नये अथवा बोधचिन्ह लावू नये.
ध्वजाचा तोरण, गुच्छ अथवा पताका म्हणून किंवा अन्य कोणत्याही प्रकारे शोभेसाठी उपयोग करू नये. कागदापासून तयार केलेला ध्वज जनतेला महत्त्वपूर्ण अशा राष्ट्रीय, सांस्कृतिक व क्रीडा विषयक कार्यक्रमांच्या वेळी लावता येईल. तथापि, असे कागदी ध्वज अशा कार्यक्रमानंतर जमिनीवर टाकू नयेत किंवा फेकू नयेत. सरकारी इमारतींवरील ध्वज अर्ध्यावर उतरविण्यात येतो. त्या प्रसंगाखेरीज ध्वज अर्ध्यावर उतरविण्यात येणार नाही.
ध्वजाची प्रतिष्ठा राखत विल्हेवाट – ध्वजाची प्रतिष्ठा राखून शक्यतोवर खासगीरीत्या त्याची विल्हेवाट लावावी. जेव्हा ध्वज मोकळ्या जागेत लावावयाचा असेल तेव्हा हवामानाची स्थिती विचारात घेता शक्यतोवर तो सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत लावावा. ध्वज फाटेल अशा कोणत्याही रीतीने तो लावू नये किंवा बांधू नये आणि जेव्हा ध्वज फाटला असेल किंवा मळल्यामुळे खराब झाला असेल तेव्हा विशेषतः जाळून किंवा त्याची प्रतिष्ठा राखली जाईल, अशा अन्य कोणत्याही पद्धतीने तो खासगीरीत्या संपूर्ण पणे नष्ट करावा.
flag hoisting meaning शैक्षणिक संस्थांमध्ये ध्वजारोहण कसे करावे – ध्वजाविषयीची आदरभावना वृद्धिगत करण्याच्या उद्देशाने राष्ट्रध्वज शैक्षणिक संस्थांमध्ये (शाळा, महाविद्यालये, क्रीडा शिबिरे, बालवीरांची शिबिरे इत्यादीमध्ये ) लावता येईल. शाळेतील विद्यार्थ्यांनी मोकळ्या चौरस जागेत शिस्तबद्ध रितीने असे उभे राहावे की, या चौरस जागेच्या तीन बाजूस विद्यार्थी असतील आणि चौथ्या बाजूच्या मध्यभागी ध्वजस्तंभ असेल.
मुख्याध्यापक, विद्यार्थी नेता आणि ध्वज फडकविणारी व्यक्ती (मुख्याध्यापका व्यतिरिक्त अन्य व्यक्ती असेल, तर ) हे ध्वजस्तंभाच्या मागे तीन पावले उभे राहतील. विद्यार्थी आपापल्या वर्गानुसार व दहा दहाच्या (किंवा विद्यार्थी संख्येनुसार कमी अधिक विद्यार्थी संख्येच्या तुकड्या करून रांगेत उभे राहतील.
या तुकड्या एकामागे दुसरी अशा पद्धतीने उभ्या कराव्यात. वर्गाच्या विद्यार्थी नेत्याने त्याच्या वर्गाची जी पहिली रांग असेल तिच्या उजवीकडे उभे राहावे आणि वर्ग शिक्षकाने आपल्या वर्गाच्या शेवटच्या रांगेमध्ये मागे तीन पावले मध्यभागी उभे राहावे. सर्वांत वरचा वर्ग उजवीकडील टोकास या प्रमाणे वरिष्ठतम वर्गाच्या क्रमानुसार वर्गांची व्यवस्था करण्यात यावी.
प्रत्येक रांगेमधील अंतर कमीत कमी एका पावलाइतके (30 इंच) असावे आणि तुकड्या तुकड्यांमधील अंतरही तेवढेच असावे. जेव्हा प्रत्येक तुकडी किंवा वर्ग तयार असेल तेव्हा वर्ग नेता एक पाऊल पुढे टाकील आणि शाळेच्या निवडलेल्या विद्यार्थी नेत्याला सलामी येईल. सर्व तुकड्या तयार झाल्यावर लगेचच विद्यार्थी नेता मुख्याध्यापकांपाशी जाईल आणि त्यांना सलामी देईल. मुख्याध्यापक ही सलामी स्वीकारतील. त्यानंतर ध्वज फडकवण्यात येईल.
why is flag hoisting done at 8am ध्वजारोहण – ध्वजारोहणाच्या वेळी ध्वज नेहमी झरकन वर चढवावा आणि उतरविताना मात्र तो सावकाशपणे व विधीपूर्वक उतरविण्यात यावा. जेव्हा ध्वजारोहणाची व ध्वज उतरविण्याची क्रिया समर्पक बिगुलाच्या सुरांवर करावयाची असेल तेव्हा ध्वजारोहणाची व ध्वज उतरविण्याची क्रिया त्या सुरांच्या बरोबरच झाली पाहिजे.
जेव्हा खिडकीची कड, सज्जा अगर इमारतीचा पुढील भाग अशा ठिकाणी आडव्या किंवा तिरक्या बसविलेल्या काठीवरून ध्वज फडकविण्यात येतो तेव्हा ध्वजाची केशरी रंगाची बाजू काठीच्या वरच्या टोकाकडे असावा. जेव्हा ध्वज भिंतीवर सपाट व आडवा लावण्यात आला असेल तेव्हा ध्वजातील केशरी रंगाचा पट्टा सर्वांत वर असावा.
आणि जेव्हा ध्वज उभा लावण्यात आला असेल तेव्हा ध्वजातील केशरी रंगाचा पट्टा त्याच्या ध्वजाच्या उजव्या बाजूस असावा म्हणजे ध्वजाकडे तोंड करून उभ्या असलेल्या व्यक्तीच्या डाव्या बाजूस असावा. जेव्हा एखाद्या वक्त्याच्या व्यासपीठावर ध्वज लावावयाचा असेल तेव्हा वक्त्याचे तोंड श्रोत्यांकडे असताना त्याच्या उजवीकडे काठीवर ध्वज लावण्यात यावा अथवा वक्त्याच्या पाठिमागे लावताना तो भिंतीवर वक्त्याच्या पाठिमागे वरच्या बाजूस लावावा.
एखाद्या पुतळ्याच्या अनावरण करण्यासारख्या प्रसंगी ध्वजाचा वापर करण्यात येईल तेव्हा तो सुस्पष्टपणे व वेगळा दिसेल, अशा प्रकारे लावण्यात यावा. जेव्हा ध्वज एखाद्या मोटार कारवर लावण्यात येईल तेव्हा तो एकतर मोटारीच्या बोनेटवर मध्यभागी मजबूत बसविलेल्या सळईवर किंवा मोटारीच्या समोरील उजव्या बाजूस लावण्यात यावा.
जेव्हा एखाद्या मिरवणुकीत अथवा संचलनाच्या वेळी ध्वज फडकवत न्यावयाचा असेल तेव्हा एक तर तो कवायतीने चालणाऱ्यांच्या उजव्या बाजूस म्हणजेच खुद ध्वजाच्या उजव्या बाजूस असावा किंवा जर अशाप्रसंगी इतर आणखी ध्वजाची रांग असेल, तर तो त्या रांगेच्या मध्यभागी पुढे असावा.
सलामी ध्वजारोहणाच्या अथवा ध्वजावतरणाच्या प्रसंगी अथवा एखाद्या संचालनामधून ध्वज नेण्यात येत असताना, अथवा पाहणी करीत असताना उपस्थित असलेल्या व्यक्तींनी त्याला उचित रीतीने सलामी द्यावी.
जेव्हा ध्वज दलाबरोबर नेला जातो तेव्हा तेथे उपस्थित असलेल्या व्यक्ती, तो समोरून नेला जात असताना, सावधान स्थितीत उभ्या राहतील किंवा सलामी देतील. उच्चपदस्थ व्यक्तीला शिरोवस्त्र (Head Dress) न घालता सलामी घेतली तरी चालेल.
ध्वजसंहिता नियमात बदल
flag code of india 2022 भारतीय ध्वज संहिता 2002 भाग-1 मधील परिच्छेद 1.2 मधील राष्ट्रध्वज हे “हाताने कातलेल्या किंवा विणलेल्या लोकर/सुत/सिल्क/खादी कापडापासून बनविलेला असेल”, या तरतुदीमध्ये 30 डिसेंबर 2021 रोजीच्या अधिसूचनेन्वये बदल करण्यात आला आहे.
या बदलानुसार राष्ट्रध्वज हे हाताने कातलेल्या आणि हाताने विणलेल्या किंवा मशीनद्वारे तयार केलेल्या सूत / पॉलिस्टर/ लोकर/ सिल्क/खादी पासून बनविलेल्या कापडाचे असावेत, असा उल्लेख केला आहे. यानुसार प्लास्टीक ध्वजाचा वापर होऊ नये, यासाठी आपण सर्वांनी कटाक्षाने खबरदारी घेणे गरजेचे आहे.
20 जुलै 2022 ला केलेल्या सुधारणेनुसार आता राष्ट्रध्वज दिवसा आणि रात्री दोन्ही वेळेला फडकावता येईल. मग तो खुल्या जागेवर किंवा घरावर असेल तरीही तो फडकावण्याची परवानगी देण्यात आली आहे.
या आधी राष्ट्रध्वज सूर्योदय ते सूर्यास्त या काळातच फडकावण्याची परवानगी होती. ध्वजारोहण मात्र सुर्यादयानंतर सकाळीच करावयाचे आहे.
लोकांनीही आपल्या तिरंग्याप्रती व या उपक्रमाकडे व्यापक दृष्टिकोनातून पाहून आपला सहभाग घेतला पाहिजे. यातील जे नियम आहेत ते समजण्यास क्लिष्ट नाहीत. यातील आदरयुक्त भावना महत्त्वाची आहे. आपला तिरंगा हा साहस, धैर्य याचे प्रतीक जरी असला तरी यातील सर्वसामावेशकता महत्त्वाची आहे.
नियमांचा अधिक बाऊ न करता मनातली भिती व दडपण प्रत्येक नागरिकांनी बाजूला सारून “हर घर तिरंगा” उपक्रमाकडे बघायला हवे. या भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाला आपल्या घरावर तिरंगा फडकवून प्रत्येकाने साक्षीदार व्हायला हवे. स्वातंत्र्याच्या 75 वर्षाच्या कालावधीत नागरिक म्हणून आलेले प्रगल्भत्व जपायला हवे. चला… घरोघरी तिरंगा लावण्यासाठी पुढे सरसावू यात. आपणही बदलाचा एक भाग बनू यात.
drone farming in dhule ड्रोन प्रात्यक्षिक प्रशिक्षण कार्यशाळा