राहुरी विद्यापीठ ,
पेरुची लागवड : guava plantation पेरुची लागवड व्यापारी तत्वावर करणे गरजेचे पेरु हे फळ सामान्य माणसाचे सफरचंद आहे. पेरु पिकाचे शेतापासून मार्केटमध्ये जाईपर्यंत अंदाजे 40 टक्के नुकसान हे काढणीपश्चात हाताळणीदरम्यान होते. सध्या पेरुच्या कमी क्षेत्राबरोबरच कमी उत्पादकता ही मोठी समस्या आहे. कृषि विद्यापीठाने सरदार, लखनौ-49 यासारखे पेरुचे दर्जेदार वाण आतापर्यंत संशोधीत केले आहे.
काढणीपश्चात तंत्रज्ञानावरही संशोधन विद्यापीठामध्ये झाले आहे. त्याचा फायदा पेरु उत्पादक शेतकरी बांधवांनी घेतल्यास त्यांना फायदा होईल. तसेच मॅग्नेट संस्थेच्या सहकार्याने शेतकर्यांनी जास्तीत जास्त क्षेत्रावर पेरुची व्यापारी तत्वावर लागवड करावी असे प्रतिपादन महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. पी.जी. पाटील यांनी केले.
सहकार व पणन विभाग, महाराष्ट्र शासन, आशियायी विकास बँक अर्थसहाय्यीत महाराष्ट्र अॅग्रीबिझीनेस नेटवर्क प्रकल्प (मॅग्नेट) व महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी यांच्या संयुक्त विद्यमाने पेरु पीक उत्पादन, सुगीपश्चात हाताळणी, विपणन, प्रक्रिया संबंधी एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन महात्मा फुले कृषि विद्यापीठात करण्यात आले होते.
राज्य पुरस्कृत आवास योजना मध्ये अहमदनगर जिल्हा अव्वल
यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरुन कुलगुरु डॉ. पी.जी. पाटील बोलत होते. यावेळी संशोधन व विस्तार शिक्षण संचालक डॉ. शरद गडाख, अधिष्ठाता डॉ. प्रमोद रसाळ, मॅग्नेटचे अतिरिक्त प्रकल्प संचालक डॉ. अमोल यादव व सहयोगी अधिष्ठाता (निकृशि) डॉ. श्रीमंत रणपिसे उपस्थित होते.
यावेळी डॉ. शरद गडाख आपल्या मार्गदर्शनात म्हणाले की संपूर्ण देशात फळपिकांखाली सर्वात जास्त क्षेत्र असलेले म्हणुन महाराष्ट्र राज्य ओळखले जाते. महाराष्ट्रात 23 लाख हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली असल्यामुळे फळपिकांची लागवड मोठ्या प्रमाणात झाली.
यामध्ये पेरु हे महत्वाचे फळ पीक आहे. बदलत्या हवामानासाठी पेरुच्या नविन जाती निर्माण करणे, कमी उंचीच्या जाती विकसीत करणे, उत्पादन खर्च कमी करणे यावर संशोधन होणे गरजेचे आहे. याचबरोबर पेरु प्रक्रिया उद्योग निर्माण झाल्यास मुल्यवर्धन होऊन शेतकर्यांना त्याचा फायदा होईल.
काढणीपश्चात पेरु पिकाची नुकसान guava tree plantation टाळण्यासाठी शितगृहांची नितांत गरज असल्याचे यावेळी ते म्हणाले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक करतांना डॉ. अमोल यादव म्हणाले की राज्यातील 11 फालोत्पादन पिकांच्या मुल्यसाखळ्यांमध्ये खाजगी गुंतवणुक आकर्षित करुन शेतकर्यांचे उत्पन्न वाढविणे, फळे व भाजीपाल्याचे काढणीपश्चात नुकसान कमी करणे व त्याची
साठवणूक क्षमता वाढविणे,मागणीनुसार मालाची मुल्यवृध्दीकरणे आणि अन्नाची वितरण व्यवस्था कार्यक्षम करणे व शेतकरी उत्पादक संस्थाना मुल्यसाखळीतील सहभाग वाढविणे हे या प्रकल्पाचा मुख्य उद्देश आहे.
शेतकरी कुटुंबाचे आर्थिक स्थान बळकट करण्याबरोबरच कार्यक्षम असे विपणनाचे जाळे महाराष्ट्रभर तयार करणे हा या मॅग्नेट प्रकल्पाचा उद्देश आहे. या कार्यशाळेमध्ये तांत्रिक मार्गदर्शनात अखिल महाराष्ट्र पेरु उत्पादक व संशोधन संघाचे
अध्यक्ष श्री. विनायकराव दंडवते, वरुण अॅग्रो नाशिकच्या कार्यकारी संचालक सौ. मनिषा धात्रक, मॅग्नेटचे आंतरराष्ट्रीय तज्ञ डॉ. विजय सचदेव, बाभळेश्वर येथील कृषि विज्ञान केंद्राचे विषय विशेषज्ञ डॉ. पुरुषोत्तम हेंद्रे, अ.भा.स. फळसंशोधन केंद्राचे
प्रभारी अधिकारी डॉ. सतिश जाधव, विद्यापीठाचे शास्त्रज्ञ डॉ. विक्रम कड, डॉ. विकास भालेराव, डॉ. रणजीत कडू, यांनी पेरु पिकावरील विविध विषयांवर guava kai plantation मार्गदर्शन केले. यावेळी मान्यवरांच्या हस्ते पेरु पीक माहिती पुस्तीकाचे विमोचन करण्यात
आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. सचिन सदाफळ यांनी तर आभार मॅग्नेटचे प्रकल्प उपसंचालक श्री. नितीन पाटील यांनी मानले. कार्यशाळेसाठी सहकार व पणन विभाग आणि मॅग्नेट प्रकल्पाचे सर्व अधिकारी व पेरु उत्पादक शेतकरी उपस्थित होते.