Grand Memorial Of Ahilya Devi like Statue of Unity

ताज्या बातम्या

स्टॅच्यु ऑफ युनिटीच्या धर्तीवर नगरमध्ये अहिल्यादेवी यांचे भव्य स्मारक व्हावे

By admin

May 31, 2024

चौंडी,

Grand Memorial Of Ahilya Devi like Statue of Unity सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या नावाने अध्यासन सुरू करण्यासाठी तसेच स्टॅच्यु ऑफ युनिटीच्या धर्तीवर शहरामध्ये भव्य स्मारक उभारण्यासाठी राज्य सरकारने सहकार्य करावे आशी मागणी महसूल तथा पालक मंत्री ना राधाकृष्ण विखे पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती दिनाच्या निमिताने श्रीक्षेत्र चौंडी येथे आयोजित केलेल्या अभिवादन कार्यक्रमास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे केंद्रीय मंत्री रामदास आठवले मंत्री अतुल सावे संजय बनसोडे आ.राम शिंदे आ.मोनिका राजळे आ.गोपीचंद पडळकर जेष्ठ नेते आण्णासाहेब डांगे जिल्हा बँकेचे चेअरमन शिवाजीराव कर्डीले आदीसह मान्यवर उपस्थित होते.

पंढरपूर मंदिरात सापडले तळघर आणि पुरातन मुर्त्या

या जिल्ह्याचे नामकरण करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतल्याबद्दल मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचे आभार मानून मंत्री विखे पाटील म्हणाले की जिल्ह्याच्या दृष्टीने ऐतिहासिक क्षण आहे.अहिल्यादेवीच्या जयंतीचे आता त्रिशताब्दी वर्ष सुरू होत आहे.यानिमिताने या जिल्ह्याची वाटचाल त्यांच्या विचाराने व्हावी यासाठी शहरामध्ये स्टॅच्यु ऑफ युनिटीच्या धर्तीवर पुण्यश्लोक अहिल्यादेवीचे स्मारक उभारण्याचा संकल्प आम्ही केला असून त्या कामालाही सुरूवात झाली आहे.हे स्मारक येणार्या पिढी करीता प्रेरणास्थान ठरेलच परंतू महीलांच्या उत्कर्षाकरीता नवी उर्जा देणारे असेल. या स्मारकाच्या कामाला राज्य सरकारने सहकार्य करावे आशी मागणी विखे पाटील यांनी केली.

पुण्यश्लोक अहिल्यादेवीच्या कार्याची महती खूप मोठी आहे.त्यांच्या वाटचालीचा इतिहास अजरामर आहे.त्यांच्या कार्याची माहीती अधिक व्यापक स्वरुपात समाजापुढे यावी याकरीता सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात त्यांच्या नावाचे अध्यासन या वर्षापासून सुरू करण्यासाठी राज्य सरकारने निर्णय करावी आशी विनंती मंत्री विखे पाटील यांनी आपल्या भाषणातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली.

चौंडी येथील स्मारक उभारणीचे काम १९९५ साली राज्यात युती सरकार असताना झाली.तत्कालीन मुख्यमंत्री स्व.मनोहर जोशी तसेच उपमुख्यमंत्री स्व.गोपीनाथ मुंढे यांचे मोलाचे सहकार्य लाभले याचा आवर्जून उल्लेख करून मंत्री विखे म्हणाले की पालकमंत्री या नात्याने या स्मारकाच्या कामात योगदान देता आले हे माझे भाग्य आहे.