ताज्या बातम्या

Gramsabha sakur ग्रामसभेत पाण्याचा प्रश्न उपस्थित करणाऱ्यावर प्राणघातक हल्ला, हल्लेखोरांवर कारवाई करा

By admin

January 07, 2023

ग्रामसभेत पाण्याचा प्रश्न उपस्थित करणाऱ्यावर प्राणघातक हल्ला, हल्लेखोरांवर कारवाई करा

एलवायएफ, बारा बलुतेदार महासंघाची पोलिस अधीक्षक, जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

अहमदनगर –

Gramsabha sakur ग्रामसभेत पाण्याचा प्रश्न विचारल्याने संगमनेर तालुक्यातील साकूर येथील सामाजिक कार्यकर्ते सुनील ईघे यांना गावगुंडांनी लोखंडी राॅड, लाकडी दांडके व लाथाबुक्यांनी मारहाण करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणातील आरोपींना अटक करून त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी लोहार यूथ फाऊंडेशन (एलवायएफ), प्रदेश बारा बलुतेदार महासंघातर्फे पोलिस अधीक्षक राकेश ओला, जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली.

याप्रसंगी राजेंद्र लाड, माऊली गायकवाड, हर्षल आगळे, किशोर सोनवणे, सागर आगळे, संदीप पवार, विजय हरिहर, दत्ता पोपळघट, अमोल जवणे, विनायक गाडेकर, सागर पवार, किशाेर पवार, नामदेव गाडेकर, रवींद्र विघवे, संतोष पवार, नीतेश लोखंडे, महेश पवार, बाळासाहेब इघे,अमर इघे, वाल्मिक इघे,अक्षय इघे, दीपक इघे, ज्ञानदेव इघे, मुकुंद इघे,सुनील इघे, अतुल जवणे, बाळासाहेब इघे, ज्ञानदेव इघे, विलास इघे, अक्षय इघे, सुनील इघे, कलीराम पोपळघट, दीपक पोपळघट आदींसह जिल्ह्यातील लोहार यूथ फाऊंडेशनचे पदाधिकारी आणि महाराष्ट्र प्रदेश बाराबलुतेदार महासंघाचे पदाधिकारी उपस्थित होते. निवेदनात म्हटले आहे की, सुनील ईघे हे संगमनेर तालुक्यातील साकुर येथे गोरगरीब आदिवासी दुर्बलांच्या हक्काचे रक्षणार्थ काम करतात. साकूर गावातील पठार भागातील ठाकर या आदिवासी बांधवांचे या गावातील सत्ताधारी पुढाऱ्यांनी राजकीय आकसापोटी पिण्याच्या पाण्याचा पुरवठा बंद केला होता. आदिवासी बांधवांचे होणारे हाल थांबवण्यासाठी तो पाणीपुरवठा सुरळीत करावा, अशी विनंती करूनही सत्ताधाऱ्यांनी दखल घेतली नाही. या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी इघे यांनी ग्रामसभेत हा विषय मांडला असताना त्यांना गाव गुंडांनी जातीवाचक शिव्या देऊन मारहाण केली. तसेच तक्रार दाखल करण्याचा प्रयत्न केला तर गावातून हाकलून देऊ, तुमच्यावर गावातून बहिष्कार टाकू, अशा धमक्या दिल्या. याबाबतची तक्रार घारगाव पोलिस स्टेशन येथे देऊन सुनील दिघे व त्याचे सहकारी प्रभाकर कदम आणि बिलाल शेख माघारी परत असताना त्यांनाही मारहाण केली. सुनील इघे यांची प्रकृती चिंताजनक आहे. ते संगमनेर येथील खासगी रुग्णालयात उपचार घेत आहेत. या गुन्ह्यातील आरोपींना तात्काळ अटक करावी, अशी मागणी निवेदनात केली आहे.

…तर लोकशाही मार्गाने आंदोलन आजचे राजकारण हे जातीपाती आिण साम, दाम, दंड, भेदाच्या पातळीवर सर्वत्र होत आहे. मात्र सर्वसाधारण दुर्बल व आिदवासी बांधवांच्या मदतीसाठी एका छोट्या लोहार समाजातील तरुण पुढे येऊन मदत करण्याचा प्रयत्न करतो अन् हाच प्रयत्न त्याच्या जीवावर उठतो हे लोकशाहीसाठी घातक आहे. या घटनेचा आम्ही एलवायएफतर्फे निषेध करतो. याप्रकरणी कारवाई करण्यात दिरंगाई झाल्यास लोकशाही मार्गाने आंदोलन करू, असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.