कडा, grampanchyat kada कडा शहरामध्ये गेल्या काही वर्षात कोट्यावधी रुपयाची विकासकामे झाली आहेत .कडा शहराचा विकास करण्यासाठी निधीची कधीही कमतरता पडू दिली नाही. त्यातच आता नव्याने मेहकरी येथून पाईपलाईन आणून शहराला शुद्ध पाणीपुरवठा करण्यासाठी 13 कोटी 50 लक्ष रुपये मंजूर झाले असून येत्या काही दिवसात काम सुरू होणार असल्याचे प्रतिपादन आमदार सुरेश धस यांनी केले.
कडा ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुकीचा बिगुल वाजला असून गुरुवारी आमदार सुरेश धस यांच्या हस्ते धवलक्रांती ग्रामविकास पॅनलच्या उमेदवारांच्या प्रचाराचा शुभारंभ मौलाली बाबा दर्गा येथे चादर अर्पण करून करण्यात आला. तत्पूर्वी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करत गावातून वाजत गाजत रॅली काढण्यात आली होती.
यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लखुनाना कर्डिले हे होते तर व्यासपीठावर अनेक मान्यवर मंडळी उपस्थित होते.
पुढे बोलताना आमदार धस म्हणाले की, कडा हे मोठ्या व्यापारपेठेचे गाव असून आता रेल्वे सुरू झाल्याने भविष्यामध्ये कडा शहराची बाजारपेठ मोठी होणार आहे. सध्या आष्टी पर्यंत रेल्वे सुरू झाली असून येत्या मार्च पर्यंत बीड पर्यंत रेल्वे जाणार असून जानेवारी किंवा फेब्रुवारी महिन्यामध्ये आष्टी ते पुणे आणि मुंबई रेल्वे सुरू झाल्याने बाजारपेठ अधिक बळकट होणार आहे. विरोधकांचा समाचार घेताना त्यांनी सांगितले की,कोरोना काळामध्ये विरोधक कुठे होते ?
एकातरी रुग्णाला दवाखान्यात नेऊन उपचार केले काय? सरपंच अनिल ढोबळे व युवराज पाटील व आणखी आमच्या पार्टीच्या कार्यकर्त्यांनी कोरोना काळामध्ये जनतेची काळजी घेतली.
त्याकाळी घरातील व्यक्ती सुध्दा भेटण्यास जात नव्हता. मात्र आमचे कार्यकर्ते रुग्णांना आधार देत होते. यावेळी विरोध कुठे गेले होते?विरोधकांनी कडा ग् गावासाठी किती विकास निधी आणला हे जाहीर सांगावे असे आवाहन त्यांनी केले. मी आमदार झाल्यापासून कडा गावाचा चेहरा मोहरा बदलला असून कोट्यावधी रुपयाची विकास कामे केली आहेत. त्यामुळे ग्रामपंचायत चुकीच्या लोकांच्या हातात देऊ नका.
चुकीच्या लोकांना विजयी करू नका. स्वच्छ व विकासात्मक प्रतिमा असणाऱ्या धवल क्रांती ग्रामविकास पॅनलच्या सरपंच लताबाई पाटील व सर्व 17 उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन आमदार सुरेश धस यांनी केले. यावेळी सरपंच अनिल ढोबळे यांनी कडा शहरांमध्ये केलेल्या विकास कामांची यादीच वाचून दाखवली.
ग्रामपंचायतची अतिभव्य अशी इमारत तयार केली असून गावातील गटारी बंदिस्त केले आहेत याशिवाय धामणगाव रस्त्यावर अत्याधुनिक जिम तयार केली आहे. जिल्ह्यात प्रथम क्रमांकाची विद्यार्थी संख्या असणाऱ्या जिल्हा परिषद शाळेला सहा खोल्या, बाकडे ,टीव्ही संच, पाणी व्यवस्था इत्यादी विकास कामे केली आहेत.
यावेळीरमजान तांबोळी, युवराज पाटील ,बाळासाहेब कर्डिले ,संदीप खाकाळ, यांनी मनोगते व्यक्त करत धवल क्रांती विकास पॅनलच्या उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन केले. यावेळी संपत सांगळे, राम मधुरकर,संजय ढोबळे,
बाळासाहेब कर्डीले, सागर खेडकर, सेवा सोसायटीचे चेअरमन उद्धव कर्डिले, नागेश कर्डिले,गोरख कर्डिले, किशोर पाटील ,राजा बापू कर्डिले ,संपत कर्डिले, सुनील देशमुख, राहुल धुमाळ ,बिपिन भंडारी, शिवराज पाटील ,श्याम कर्डिले
,हनुमंत परदेशी ,बालु कर्डिले ,अमोल कर्डिले ,शिवाजी कर्डिले, सचिन घावटे ,सुरेश खेडकर ,धनंजय मुथा, प्रकाश
खेडकर ,सुभाष घावटे ,शंकर शेलार, राम ससाने ,दीपक सोनवणे ,संतोष मेहत्रे, रमेश शिरोळे, दत्ता होळकर ,राजू साळवे महेश घोलप ,गोविंद मिश्रा, सुभाष ढोबळे, प्रवीण बहिर यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक संपत सांगळे यांनी केले तर आभार योगेश भंडारी यांनी मानले.