gram panchyat elections : या गावाने टाकला निवडणुकीवर बहिष्कार
बीड
gram panchyat elections बीड तालुक्यातील मेंगडेवाडी येथे असलेले मतदान केंद्र प्रशासनाने चऱ्हाटा येथे नेल्याने मेंगडेवाडी येथील ग्रामस्थांनी मतदानावर बहिष्कार टाकला आहे. गेल्या 25 वर्षापासून जाधववाडी मेंगडेवाडी धुमाळवाडी या गावांसाठी मेंगडेवाडी येथे मतदान केंद्र होते . मात्र हे मतदान केंद्र अचानक चऱ्हाटा येथे नेण्यात आले.त्यामुळे नागरिक संतप्त झाले आहेत.
चऱ्हाटापासून जाधवाडी मेंगडेवाडी याचे अंतर पाच किलोमीटर आहे हे तिन्ही गावे डोंगरे विकास दुर्गम भागामध्ये मोडतात.असे असताना प्रशासनाने हे मतदान केंद्र हलवून चऱ्हाटा येथे नेले .त्यामुळे नागरिक संतप्त झाले.यासाठी नागरिकांनी ठिय्या देत प्रशासनाचा निषेध करत मतदान केंद्र मेंगडेवाडी येथे देण्यात यावे अशी मागणी करत मतदांनावर बाहिष्कार टाकला आहे.