बीड
Give the Maratha Kunbi certificate to the ruler: Jarange Patil माझं आंदाेलन सुरू असताना मी चार शब्दाची मागणी केली हाेती. त्यात तिसरा शब्द सगेसाेयरऱ्यांना कुणबी प्रमाणपत्र मिळाले पाहिेजे ही हाेती परंतु गिरीष महाजन यांनी मागील आठ दिवसापासून सगेसाेयरे टिकत नाही अशी बाब समाेर आणली आहे. त्यामुळे आता चाैथा शब्द हा मागेल त्याला कुणबी प्रमाणपत्र द्या ही मागणी बीड जिल्ह्यातून करत आहे. राज्यकर्त्याहाे आम्ही आता शांत बसणार नाहीत, अशा शब्दात मराठा योध्दा मनोज जरांगे पाटील यांनी असा इशारा बीड येथून सत्ताधारी महायुती आणि विराेधक महाविकस आघाडीच्या नेत्यांना दिला आहे.
मराठा योध्दा मनोज जरांगे पाटील म्हणले, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण दिले पाहिजे ताेपर्यंत आम्ही शांत बसणार नाही. ओबीसी नेत्यांनाे तुमचं आमचं वैर नाही. मराठा समाजाला साेबत घ्या, गोड बाेला, मराठा समाज तुमचा आहे. छगन भुजबळ यांनी कितीही तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला तरी संयम ठेवा. विधानसभा निवडणूकीत दाखवून देऊ. लाेकांनी जातीवाद केला, आपल्याला जातीवाद करायचा नाही. बीड जिल्ह्यात व राज्यात शांतता ठेवायची आहे, यासाठी बीड जिल्ह्यात ही शांतता रॅली आहे. सभेची संगता राष्ट्रगीताने झाली.