fireflies festival akole bhandardara

ताज्या बातम्या

कधी आणि कुठे असतो काजवा महोत्सव ? 

By admin

May 16, 2024

भंडारदरा  fireflies festival akole bhandardara काजवा म्हंटले कि लुकलुकणारा किडा, या किड्याच्या उजेडाने आसमंत चांदण्यासारखा चंदेरी प्रकाशाने न्हाऊन निघतो. या काजव्यांचा झगमगाट पाहण्यासाठी सह्याद्रीच्या डोंगररांगा मध्ये पर्यटकांची झुंबड उडते.

विशेषतः अहमदनगर जिल्ह्यातील भंडारदरा धरणाच्या परीसरातील कळसुबाई-हरिश्चंद्रगड अभयारण्यात Firefly काजवा महोत्सव पर्यटकांसाठी पर्वणीच असते. यासाठी सह्याद्रीच्या रांगांमधील अनेक भागात हे महोत्सव आयोजित केले जातात. fireflies events त्यांना मोठा प्रतिसाद पर्यटकांकडून मिळतो.

अकोले तालुक्यातील भंडारदरा धरणाच्या परीसरातील कळसुबाई-हरिश्चंद्रगड अभयारण्यात काजवा महोत्सवात यावर्षी पर्यटकांनी हाऊसफुल होणार आहे. या महोत्सवासाठी अगोदरच बुकींग फिक्स झाल्या आहे असून काजव्यांसाठी भंडारदरा सजला आहे.अकोले तालुक्यातील पश्चिमेला सह्याद्रीच्या पर्वतरांगेत असणाऱ्या कळसुबाई- हरिश्चंद्रगड अभयारण्यात पावसाळ्याच्या अगोदर काजव्यांची चमचम सुरु होत असते. ही काजव्यांची चमचम म्हणजे पावसाची चाहुल असते. हिरडा, बेहडा, सादडा यासारख्या झाडांवर स्वयंप्रकाशित काजवा किटक कोट्यावंधींच्या संख्येने एकाच वेळेस लयपद्ध पद्धतीने चमकत असतात. कधी असतो काजवा महोत्सव ? 

fireflies festival akole bhandardara dates 2024 हा काजव्यांचा चमत्कार बघण्यासाठी दरवर्षी दि. 25 मे ते 15 जुनपर्यंत हजारो पर्यटक भंडारद-यात दाखल होत असतात. याही वर्षी काजव्यांची चमचम वेळेवर सुरु होण्याची शक्यता आहे. अनेक पर्यटकांनी काजव्यांचा हा करिष्मा व्यवस्थित बघता यावा म्हणून टेंटधारक व मिडीयाचा आधार आपली जाहीरात केली आहे.

उष्माघात होऊ नये यासाठी नागरिकांनी प्रतिबंधात्मक उपायांवर भर दयावा

काजवा महोत्सवासाठी होणारी गर्दी लक्षात घेता वनविभागाकडून जोरदार तयारी सुरु आहे. पर्यटकांना काजव्यांचा व्यवस्थित आनंद घेता यावा म्हणून अभयारण्यातील असणाऱ्या प्रत्येक गावातील सदस्यांची आढावा बैठकही आयोजित केली गेली असल्याचे खात्रीलायक वृत्त हाती आले आहे. भंडारदऱ्यातील हॉटेल्स व महाराष्ट्र पर्यटन निवास यांनीही पर्यटकांना काजवा महोत्सवात आकर्षित करण्यासाठी विशेष सवलती दिल्या आहेत. अनेक टेंटधारकही सवलतीच्या दरात बुकींग करत आहेत. कोरोनाचे सावट आता पुर्णपणे नाहीसे झाल्याने गत तीन ते चार वर्षांपासुन काजवा महोत्सव जोमाने सुरु झाला आहे. यावर्षी मात्र भंडारदऱ्याचा काजवा महोत्सव हाऊसफुल होणार आहे. 

हॉटेल मध्ये अॅडव्हॉन्स बुकींग केली आहे. काही ऑर्गनायझर्ससे काजवा महोत्सवामध्ये वेगवेगळे इव्हेंट आयोजित केले आहेत. अनेक आयोजकांनी पर्यटकांना काजवा महोत्सवात आकर्षित करण्यासाठी सोशल मिडिया चा वापर केला आहे.