मुंबई Eknath shinde today विधानसभा अध्यक्षांची निवड झाल्यानंतर आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सरकारला विश्वासदर्शक ठरावाला सामोरे जावे लागले.यामध्ये झालेल्या एकनाथ शिंदे गटाच्या बाजूने 164 मते पडली तर विरोधात 99 मते पडली.त्यानंतर एकनाथ शिंदे मंत्रिमंडळातील विश्वासदर्शक मंजूर झाल्याचे अध्यक्ष राहूल नार्वेकर यांनी जाहीर केले. सुरुवातीला शिरगणती सुरू झाल्यानंतर अध्यक्षांनी ठरावाच्या बाजूने 164 मतदान झाल्याचे जाहीर करत ठराव संमत झाल्याचे घोषित केले. मंत्रिमंडळावर विश्वासदर्शक ठराव सुधीर मुनगंटीवार यांनी मांडला. त्याला भरत गोगावले यांनी अनुमोदन दिले. एकनाथ शिंदे यांच्या बाजूने संतोष बांगर यांचे मत आज वाढले मात्र राहुल नार्वेकर अध्यक्षपदी असल्याने त्यांचे मत सत्तारूढ बाजूला कमी झाले.त्यामुळे 164 मते पडली.
Eknath shinde today
विश्वासदर्शक ठराव मांडल्यानंतर तीन सदस्य तटस्थ राहिले.यामध्ये सपा चे दोन एम आय एम चा एक यांचा समावेश आहे.
today’s corona cases in Ahmednagar : जिल्ह्यात 29 कोरोना बाधित
शिवसेनेचा पक्षादेश पाळला नसल्याचा मुद्दा सुनिल प्रभू यांनी उपस्थित करण्याचा प्रयत्न केला मात्र हे सगळं सभागृहाच्या पटलावर आहे असं सांगत अध्यक्षांनी त्यांना परवानगी नाकारली. सभागृहाचे दरवाजे उघडल्यावर अशोक चव्हाण, विजय वडेट्टीवार यांच्या सह अनेक विरोधी सदस्य सभागृहात उपस्थित झाले.