अहमदनगर,
e peek pahani 2022 अतिवृष्टीने नूकसान झालेल्या क्षेत्राचे पंचनामे, जलद गतीने होण्यासाठी ‘ई पीक’ पाहणी e pik pahani पंचनाम्याची अट काही दिवसांपूर्ती शिथील करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची, माहीती राज्याचे महसूल पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय विकास मंत्री तथा जिल्हयाचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली.
पालकमंत्री श्री. विखे पाटील यांनी आज तिसर्या दिवशी शेवगाव आणि पारनेर तालुक्यातील नूकसानग्रस्त भागाची पाहणी करून ठिक ठिकाणी शेतक-यांशी संवाद साधला.e pik pahani app
थेट बांधावर जावून त्यांनी सर्व वरीष्ठ अधिकारी यांच्या समवेत त्यांनी बाधीत झालेल्या शेती पिकांची पाहाणी करून पंचनाम्याचा आढावा घेतांना, आळकुटी, निघोज येथील ग्रामास्थांशी संवाद साधतांना ते बोलत होते.
पालकमंत्री श्री. विखे पाटील म्हणाले, शेतकऱ्यांकडून पंचनाम्या संदर्भात येत असलेल्या तक्रारीची दखल घेवून ‘ई पीक’ पाहाणी पंचनाम्याची अट काही दिवसां करीता शिथील करण्यात येत असल्याचा निर्णय जाहीर केला. अनेक ठिकाणी रेंज मिळत नसल्याच्या तक्रारी आहेत.e pik pahani app download marathi
शेतकऱ्यांकडे अॅन्डरॉईड मोबाईल नाहीत.अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना पंचनामे होतील की नाही अशी भीती असून या संकटात पंचनाम्याच्या बाबतीत कोणतीही त्रुटी राहू नयेत म्हणून, सरसकट पंचनामे करण्याचे आदेश आपण दिले आहेत.e peek mahabhumi gov in
राज्य शासन शेतक-यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असून, एकही शेतकरी मदतीपासून वंचित राहाणार नाही याची काळजी शासन निश्चितपणे घेईल अशी ग्वाही त्यांनी दिली. यापूर्वी आलेल्या नैसर्गिक संकटातील शेतकऱ्यांना राज्य शासनाने मदत देवून दिलासा दिला आहे.e pik pahani online maharashtra
मदतीचा निर्णय करताना दोन हेक्टरची अट शिथील करून तीन हेक्टरपर्यत त्याची मर्यादा वाढवली असून मदतीच्या रकमेतही पहील्यांदाच वाढ करण्यात आली असल्याचे श्री. विखे पाटील यांनी सांगितले.
पालकमंत्री, श्री. विखे पाटील यांनी आळकुटी, निघोज, जवळा, गांजीभोयरे या गावातील नूकसान झालेल्या पिकांची पाहाणी करून शेतक-यांच्या मागण्याचे निवेदन स्विकारली.
यावेळी जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, प्रांताधिकारी सुधाकर भोसले, तहसिलदार शिवकुमार अवलकंठी, पशुसंवर्धन उपायुक्त डॉ तुंभारे, सुजित झावरे, वसंतराव चेडे, विश्वनाथ कोरडे, डॉ भास्करराव शिरोळे, राहूल शिंदे, सचिन वराळ, शिवाजीराव सालके, बाळासाहेब पठारे, यांच्यासह सर्व विभागाचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.