धुळे ,
drone farming in dhule कृषी क्षेत्रात बदलती आव्हाने लक्षात घेत नवीनतम ड्रोन तंत्रज्ञान समजून घेऊन, त्यामधील तांत्रिक बाबींचे अवलोकन करून, कमी काळात अधिक प्रभावी वापर आणि अधिकतम लाभ याचे उदाहरण असणारे असे ड्रोन तंत्र शेतीत कृषी उत्पादन खर्च कसा कमी करता येईल या कडे लक्ष देत शेतकरी बांधवांनी वाटचाल करावी असे आवाहन सहयोगी अधिष्ठाता, कृषि महाविद्यालय, धुळे डॉ.चिंतामणी देवकर यांनी कृषी विज्ञान केंद्राच्या प्रक्षेत्रावर आयोजित एकदिवशीय ड्रोन प्रशिक्षण कार्यशाळेत केले ते अध्यक्षस्थानावरून उपस्थितांना मार्गदर्शन करत होते.
जिल्ह्यात महाऊर्जेच्या ‘उज्ज्वल भारत, उज्ज्वल भविष्य’ महोत्सवास सुरूवात
महात्मा फुले कृषी विद्यापीठ कृषी महाविद्यालय धुळे, कृषी विज्ञान केंद्र, धुळे आणि सिंजेटा इंडीया प्रा.ली. यांचे संयुक्त विद्यमाने कृषी विज्ञान केंद्र धुळे प्रक्षेत्रावर एक दिवसीय” ड्रोन प्रात्यक्षिक प्रशिक्षण कार्यशाळेचे” आयोजन करण्यात आले होते.
drone farming in dhule
यावेळी उपविभागीय कृषी अधिकारी शांताराम मालपुरे, कृषी विज्ञान केंद्राचे कार्यक्रम समन्वयक डॉ.दिनेश नांद्रे, सिंजेटा चे विभागीय विक्री प्रमुख तुकाराम औटी, कृषी महाविद्यालायचे विभाग प्रमुख, प्राध्यापक, कृषी विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ, अधिकारी ,कर्मचारी ,धुळे जिल्ह्यातील प्रगतशील शेतकरी, शेतकरी शास्त्रज्ञ मंचाचे सदस्य, विद्यार्थी, उपस्थित होते. ड्रोन फवारणी प्रात्यक्षिकाचा मुख्य उद्देश हा प्रामुख्याने पीक फवारणी, पीक निरीक्षण, पीक वाढीचे मूल्यांकन, ड्रोन परागीकरण, तण, कीड आणि रोगावर नियंत्रण, पक्षापासून संरक्षण, पिकांची देखरेख अशा विविध अंगा सोबत मजुरीची कमतरता या मुख्य प्रश्नावर उपाय म्हणून देखील भविष्यात करता येईल असे सांगत उपस्थितांना मार्गदर्शन केले
सिंजेटा च्या वतीने सध्या द्रोण यात्रा काढण्यात आली असून या निमित्ताने धुळ्यात नवीनतम द्रोण टेक्नॉलॉजी ची ओळख विद्यार्थी शेतकरी यांना व्हावी यासाठी प्रत्यक्ष प्रात्यक्षिक आज कृषी विज्ञान केंद्राच्या सोयाबीन बिजोत्पादन प्रक्षेत्रावर घेण्यात आले यावेळी ड्रोन फवारणी तंत्रज्ञान प्रात्यक्षिक, तसेच ड्रोन उडवण्यापूर्वी आणि खाली उतरवतानाही काय काळजी घ्यावयची, द्रोणचे तंत्र, याविषयी उपस्थितांना प्रत्यक्ष प्रात्यक्षिका मधून समजावून सांगितले .