धुळे
स्वच्छ भारत अभियान २.० आणि माझी वसुंधरा अभियानाच्या अनुषंगाने धुळे जिल्ह्यात प्रशासनामार्फत ५० लक्ष वृक्ष लागवडीचा उपक्रम राबविण्यात येत आहेत.
या उपक्रमांतर्गत नगरपालिका प्रशासनातर्फे धुळे महानगरपालिका, जिल्ह्यातील सर्व नगरपरिषदेच्या मोकळया जागेत वृक्ष लावण्यासाठी झाडांच्या बीयांचे वाटप जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले.
यावेळी धुळे महानगरपालिकेचे उपायुक्त हेमंत निकम, जिल्हा सहआयुक्त शिल्पा नाईक, मुख्याधिकारी शिरपूर, प्रशांत बीडगर, मुख्याधिकारी शिंदखेडा, देवेंद्रसिंग परदेशी, साक्री आणि पिंपळनेर येथील लेखापाल आरती काळे यांच्यासह अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
जिल्हा सहआयुक्त शिल्पा नाईक म्हणाल्या की, जिल्ह्यात ५० लक्ष वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट असून नगरपरिषद विभागास ५ लक्ष वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट दिलेले आहे. त्यानुसार रोपे तयार करण्याची प्रक्रिया सुरू होण्यासाठी बीयांचे वाटप करण्यात आले आहे.
या माध्यमातून वृक्ष लागवडीसाठी हातभार लागणार आहेत. धुळे जिल्ह्यामध्ये पावसाळयात जास्तीत जास्त वृक्ष लागवडीचा मानस डोळयासमोर ठेवून त्याची पूर्वतयारी म्हणून जिल्ह्यातील नागरीक, पालिका कर्मचारी, शाळा, कॉलेज, सेवाभावी संस्था इत्यादींचा सहभाग घेऊन सीड बाल (डएएऊ इAङङ) ही संकल्पना रावबून पावसाळयात पालिका स्तरावरुन पालिका कर्मचारी, शाळा, कॉलेज, सेवाभावी संस्था इत्यादीच्या सहयोगाने जास्तीत जास्त वृक्ष लागवडीसाठी आज झाडांच्या बीयांचे प्रातिनिधीक स्वरुपात वाटप करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी जिल्हाधिकारी यांच्या हस्ते जिल्ह्यातील नगरपालिका मुख्याधिकारी यांना प्रतिनिधीक स्वरूपात बीयांचे वाटप करण्यात आले.