विशेष वृत्त

उत्सव’ती’ च्या कवितेने पाडवा गोड झाला

By admin

November 15, 2023

 

अहमदनगर

Dipawali pahat kavita “पाडव्याच्या दिवशी तिला व्यक्त होण्यासाठी विचारपीठ मिळाले असून नेहमी कामापुरत्या बाहेर पडणाऱ्या महिला आज आपल्या भावना, आपला आवाज, आपलं मन व्यक्त करत काव्य शब्द रूपाने आजचा पाडवा साजरा करतं आहेत.” असे प्रतिपादन छत्रपती संभाजी नगर येथील ज्येष्ठ साहित्यिक प्रिया धारूरकर यांनी व्यक्त केले.

शब्दगंध साहित्यिक परिषदेच्या shabdgandh sahityik parishad  Ahmednagar वतीने कोहिनूर मंगल कार्यालयात आयोजित उत्सव ‘ती’ च्या कवितेचा या काव्य संमेलनाच्या अध्यक्षपदावरून त्या बोलत होत्या. यावेळी विचारपिठावर श्रीमती लतिका पवार, प्रा.मेधाताई काळे, श्रीरामपूर पं. स.च्या माजी सभापती प्रा.सुनीता गायकवाड, शब्दगंधच्या राज्य संघटक शर्मिला गोसावी या उपस्थित होत्या.

पुढे बोलताना प्रिया धारूरकर म्हणाल्या की, महिला आता सक्षम होत असून आपल्या मनातील भावभावनांना विचारपीठावरून वाट मोकळी करून देत आहेत. महिलांचे हे उस्फूर्तपणे व्यक्त होणे आनंददायी असून त्यामुळे समाजातील स्त्री पुरुष असमानता कमी होण्यासाठी पाठबळ मिळणार आहे. लतिकाताई पवार बोलताना म्हणाल्या की, आचार विचाराचे स्वातंत्र्य मिळाल्याने महिला आता विचार करू लागल्या आहेत,सुख दुःखाच्या कथा,कविता लिहीत असून आपले कुटुंब चालवण्यासाठीही त्या सक्षम होत आहेत. स्री आणि पुरुष हे रथाचे दोन चाक असून ते सुरळीतपणे चालणे आवश्यक आहे. म्हणुनच शब्दगंधने राबवलेला हा उपक्रम निश्चित प्रेरणादायी आहे. यावेळी कवयित्री सरोज आल्हाट,ऋता ठाकूर,प्रांजली वीरकर,प्रबोधिनी पठाडे, सुजाता पुरी, सुरेखा घोलप, मंजुश्री वाळुंज, दुर्गा कवडे, सुवर्णलता गायकवाड, उज्वला धस, समृद्धी सुर्वे, वर्षा भोईटे, सुजाता रासकर, संगीता फसाटे, सरला सातपुते,समिक्षा धस, सुनंदा नागुल, सुलभा गोरे, स्वाती ठूबे, रेखा दहातोंडे यांच्यासह अनेक कवयित्रींनी आपल्या रचना सादर करून रंगत आणली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शब्दगंधच्या राज्य संघटक शर्मिला गोसावी यांनी केले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राज्य कार्यकारिणी सदस्य कवयित्री स्वाती ठुबे यांनी केले. शेवटी कवयित्री सुरज आल्हाट यांनी आभार मानले. कार्यक्रमास शब्दगंध चे संस्थापक सुनील गोसावी, अध्यक्ष राजेंद्र उदागे, संयोजन समितीचे अध्यक्ष ज्ञानदेव पांडूळे, बाप्पूसाहेब भोसले, सुभाष सोनवणे, भगवान राऊत,प्रा.सिताराम काकडे,राम खुडे, संदीप सदाफुले, देविदास बुधवंत,डॉ. तुकाराम गोंदकर, प्रा.डॉ.अनिल गर्जे,राजेंद्र पवार, बबनराव गिरी, सुनील धस, रघुनाथ आंबेडकर, शिवाजीराव वाळुंज,अरुण आहेर, महादेव गाडे,विजय बेरड, अभिजीत धारूरकर, अजित कटारिया इत्यादी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी इंदूमती सोनवणे, आरती गिरी, दिशा गोसावी, हर्षली गिरी, जयश्री राऊत,आत्मजा गिरी, ऋषिकेश राऊत,निखिल गिरी यांच्यासह शब्दगंधच्या पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले. काव्यरचना सादर केलेल्या सर्व कवयित्रींना श्रीमती चंद्रकला आरगडे यांचा ओवीतील शब्द फुले हा काव्यसंग्रह भेट देण्यात आला. यावेळी बाल चित्रकार गौरव भुकन याने रेखाटलेले पेन्सिल चित्र शर्मिला गोसावी यांना प्रदान करण्यात आले. दिवाळी फराळ व दिवाळी अंक वाटप करुन कार्यक्रमाची सांगता झाली.