dhananjay munde warns leader in ashti

ताज्या बातम्या

मौका सभी को मिलता है ;धनंजय मुंडे यांचे सूचक वक्तव्य कोणासाठी ?

By admin

April 30, 2024

 

आष्टी (प्रतिनिधी) –

dhananjay munde warns leader in ashti बीड जिल्ह्यात सध्या लोकसभा निवडणुकीत जाती च्या राजकारणावर भर दिला जात असल्याचे बोलले जाते. याचं मुद्द्यावर भाजपच्या उमेदवार पंकजा मुंडे यांनी अनेक वेळा वक्त्यव्य केली. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस चे मंत्री धनंजय मुंडे यांनीही आष्टी येथील ,बीड येथील सभेत जातीच्या वापर राजकारणासाठी होत असल्याचे सांगितले. यावर पुढे जाऊन त्यांनी स्थानिक आमदार आणि नेत्यांना सुनावत मौका सभी को मिलता है l असे सांगून आगामी विधान सभा निवडणुकीत पाहू असा संदेश देऊन टाकला.

जिल्ह्यातील लोकसभा निवडणुकीत पंकजा मुंडे विरुद्ध मराठा असा वाद वाढतांना दिसत आहे. याचा अनुभव पंकजा मुंडे यांना माजलगाव, केज , गेवराई या  तालुक्यात पाहावयास मिळाला . त्यांच्या समोर मराठा आरक्षण आंदोलकांनी घोषणाबाजी केली. यावरून हे चित्र समोर येत आहे.

बीड जिल्ह्यात बीड वगळता पाच ही विधानसभा क्षेत्रात भाजपा आणि महायुती तील आमदार आहेत. त्यात आणखी  आष्टी येथील विधान परिषद सदस्य सुरेश धस यांची भर आहे . म्हणजे एकूण सहा आमदार महायुती बरोबर आहेत. त्याचबरोबर नेत्यांची आणि कार्यकर्त्यांची फळी आहे. अशा स्थितीत  मात्र गावातील गावातील नागरिक नेत्यांचे ऐकत नसल्याचा सूर येत आहे.

 

काही भागातील नेत्यांना नागरिकांनी तुमच्या वेळी पाहू असे स्पष्टच सांगितले. तर काही नेत्यांनी मुख्य कार्यकर्त्यांना बोलावून मते पडलीच पाहिजे असेही ठणकावून सांगितले. त्यावरही असाच सूर येत असल्याचे पाहून मंत्री धनंजय मुंडे यांनी थेटच नेत्यांना इशारा दिला. पुढचे काय ते पाहू पुढे डिपीडीसी आहे, 45/15 ची कामे आहेत. त्यावेळी विचार करू असे ही सांगितले. पुढे जाऊन त्यांनी जर कार्यकर्ते तुमचे ऐकत नसतील तर तुम्ही नेते कसे असा प्रश्न ही उपस्थित केला.

 

त्याच प्रकारची प्रगती व विकास बीड जिल्ह्याला अपेक्षित असून, आता बीड जिल्हा सुद्धा जात-पात धर्म या गोष्टींना थारा न देता कर्तृत्व अंगी असलेल्या व विकासाची क्षमता असलेल्या नेतृत्वालाच लोकसभेत पाठवणार आहे, असे मत राज्याचे कृषिमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते धनंजय मुंडे यांनी आष्टी येथे बोलताना व्यक्त केले आहे.

यावेळी आ.बाळासाहेब आजबे, मा.आ.भीमराव धोंडे यांसह मान्यवरांनी आपले मत मांडत पंकजाताई मुंडे यांना आष्टी-शिरूर-पाटोदा मतदारसंघातून सर्वाधिक मताधिक्य देण्याचे आवाहन केले. व्यासपीठावर आ.बाळासाहेब काका आजबे, मा.आ.भीमराव धोंडे, डॉ.शिवाजीराव राऊत, रामकृष्ण बांगर, वणवे दादा, वाल्मिक निकाळजे, किशोर नाना हंबर्डे, साहेबराव मस्के, दीपक घुमरे, शंकर देशमुख, विश्वास नागरगोजे, बबन अण्णा झाम्बरे, विठ्ठल सानप, भाऊसाहेब लटपटे, काकासाहेब शिंदे, अजय धोंडे, लालाभाऊ खुमकर, धैर्यशील थोरवे, महाराष्ट्र केसरी सईद चाऊस, पप्पू गुंड, रघुनाथ शिंदे, हरिभाऊ जंजिरे, सतीश बडे, बबनराव आवळे, प्रफुल सहस्त्रबुद्धे, असताक शेख, नाजीम शेख यांसह आदी उपस्थित होते.