योजना

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना कार्यान्वित केल्याबद्दल परळी येथे धनंजय मुंडे यांचा सत्कार

By admin

July 06, 2024

परळी मतदारसंघासह बीड जिल्ह्यात जास्तीत जास्त महिला लाभार्थी भगिनींना लाभ मिळवून देण्याचे धनंजय मुंडे यांचे आवाहन

परळी वैद्यनाथ

Dhananjay Munde felicitated at Parli for implementing Chief Minister Majhi Ladki Bahin Yojana महाराष्ट्र राज्यात नव्याने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना कार्यान्वित केल्याबद्दल परळी वैद्यनाथ येथील जगमित्र कार्यालयामध्ये राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांचा राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला पदाधिकारी तसेच परळीतील अनेक महिला भगिनींनी एकत्र येऊन सत्कार करत त्यांच्या माध्यमातून महायुती सरकारचे आभार मानले आहेत.

राज्य सरकारची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही अत्यंत महत्त्वाकांक्षी योजना असून याद्वारे आर्थिक दुर्बल कुटुंबातील महिला भगिनींना थेट दीड हजार रुपयांचे मासिक अर्थसहाय्य मिळणार आहे.

या योजनेच्या माध्यमातून परळी वैजनाथ मतदारसंघासह बीड जिल्ह्यात जास्तीत जास्त महिला भगिनींना लाभ मिळवून देण्यासाठी सर्व महिला पदाधिकाऱ्यांनी पुढाकार घ्यावा असे आवाहन यावेळी धनंजय मुंडे यांनी सर्व उपस्थित महिला पदाधिकाऱ्यांना केले आहे.

6 तासांचा जनता संवाद

दरम्यान धनंजय मुंडे यांनी आपल्या जगमित्र या संपर्क कार्यालयात आज परळी ते बीड जिल्ह्यातील जनतेशी जनता संवाद उपक्रमाच्या माध्यमातून संवाद साधला. यावेळी नेहमीप्रमाणे असंख्य कार्यकर्ते व नागरिक आपले वेगवेगळे प्रश्न अडचणी व समस्या घेऊन धनंजय मुंडे यांना भेटले; तर शक्य त्या ठिकाणी लगेचच फोन करून किंवा संबंधितांना पत्र देऊन किंवा अन्य मार्गांनी संबंधितांची कामे मार्ग लावण्याचे काम धनंजय मुंडे यांनी केले. हजारावर नागरिक व कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत आज दुपारी तीन वाजता सुरू झालेला जनता दरबार सायंकाळी नऊ वाजले तरीही सुरू होता!