बीड
Dasara melava pankaja munde बीड जिल्ह्याला रेल्वे यावी हे बीड जिल्ह्यातील अनेक असंख्य नागरिकांनी त्यांचे स्वप्न आहे. त्यासाठी अनेकांनी प्रयत्न देखील केलेले आहेत. माझी बहीण प्रीतम मुंडे खासदार असताना तिने रेल्वे बीड जिल्ह्यात आणली आहे आता बीड जिल्ह्याला हक्काचं आणि दुष्काळ मुक्त करण्यासाठी लागणारे पाणी आणल्याशिवाय मी झोपणार नाही अशी घोषणा करत बीड जिल्ह्यामध्ये जातिवादाचे धर्मवादाचे जे राक्षस निर्माण झालेले आहेत यांना संपवण्यासाठी नवरात्रीच्या निमित्ताने दुर्गेकडे शक्तीची प्रार्थना करत आहे असे असा दणदणीत इशारा जातीच्या समीकरणावर राजकारण करणाऱ्यांना पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी सावरगाव येथील दसरा मेळावा निमित्ताने दिला.
भगवान बाबा यांच्या जन्मभूमी सावरगाव येथे दसरा मेळाव्याच्या निमित्ताने पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे बोलत होते यावेळी व्यासपीठावर आमदार धनंजय मुंडे, माजी खासदार प्रीतम मुंडे, आमदार नमिता मुंदडा, आमदार मनोज कायंदे, रासपचे सर्वेसर्वा महादेव जानकर, माजी आमदार भीमराव धोंडे, माजी आमदार बाळराजे पवार, भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष शंकर देशमुख, सरचिटणीस सर्जेराव तांदळे आधी प्रमुख पदाधिकारी यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते.
पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या, संतश्रेष्ठ भगवान बाबा यांनी सर्व जाती-धर्मांना एकत्रितपणे राहण्याची शिकवण दिली. त्याचबरोबर माझे वडील गोपीनाथराव मुंडे यांनी देखील दिलेला वसा आणि वारसा मी शेवटच्या श्वासापर्यंत जनतेच्या हितासाठी जपणार आहे. एक स्त्री म्हणून राजकारण करत असताना नवदुर्गेकडे शक्तीची मागणी करत आहे बीड जिल्ह्यामध्ये जातिपातीचं राजकारण आणि जातीवादाचे धर्मवादाचे राक्षस निर्माण झालेले आहेत हे राक्षस संपवण्यासाठी जातीवादाचे धर्मवादाच्या भिंती मोडून काढण्यासाठी दुर्गेकडून शक्तीची मागणी करत आहे तरच बीड जिल्ह्यामध्ये चांगले दिवस येतील असाही इशारा जातीच्या समीकरणावर राजकारण करणाऱ्यांना पंकजा मुंडे यांनी दिला.
श्रीक्षेत्र भगवान भक्ती गड सावरगाव येथे या मेळाव्यासाठी सर्व जाती पातीचे लोक येथे एकत्र आले आहेत ही सद्भावना अत्यंत महत्त्वाची आहे भविष्यातही माझ्या हातून सर्व जातीपातीचे लोक एकत्र राहतील आणि त्यांच्यासाठीच काम करण्याची इच्छा आहे असेही त्या म्हणाल्या. आम्ही जसे राजकारणात आलो आहोत तेव्हापासून आत्तापर्यंत जात कधी पाहिली नाही माणूस हीच जात म्हणून आम्ही राजकारणामध्ये समाजकारणामध्ये काम करत आहोत मात्र आता आमच्या लेकरांच्या ताटातून आरक्षण घेऊ नका, जे मिळालं आहे ते आनंदाने स्वीकारा असेही मंत्री पंकजा मुंडे यांनी यावेळी स्पष्ट केले.
शेतकऱ्यांना मदत करण्याचं वचन : मंत्री पंकजा मुंडेबीड जिल्ह्यासह राज्यभर मुसळधार पाऊस झालेला आहे अतिवृष्टीमुळे असंख्य शेतकऱ्यांचे नुकसान झालेला आहे मी सरकारमध्ये आहे म्हणून कोणत्या शेतकऱ्यांवर आर्थिक नुकसान होऊ देणार नाही आमचे सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे आहे. या व्यासपीठावरून जिल्ह्यातील शेतकऱ्यांना वचन देते की कोणत्याही प्रकारची काळजी करू नका सरकार म्हणून आम्ही तुम्हाला आवश्यक ती मदत वेळेत उपलब्ध करून असाही आशावाद पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी दसरा मेळाव्याच्या निमित्ताने सावरगाव येथून दिला.