छत्रपती संभाजीनगर
cm eknath shinde marthawada meeting मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी आज छत्रपती संभाजीनगर विभागीय आयुक्त कार्यालयात मराठवाडा विभागाची पाणीटंचाई, चार टंचाई बैठक घेतली.
अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीबाबत आढावा घेतला. यानंतर पत्रकार परिषदेत बोलताना मराठवाड्यात टॅंकर सुरु असुन १२५० गावात १८०० टॅंकर द्वारे पाणीपुरवठा केला जातोय. गरज भासल्यास आणखी टॅंकर सुरु करायच्या सूचना प्रशासनाला दिल्या असुन मागितल्यावर ३ दिवसात टँकर आणि चारा मिळेल असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.
पाणी पुरवठा करताना ते चांगले असावे असेही त्यांनी सांगितले. पिण्याच्या पाण्याला व जनावरांच्या चाऱ्याला प्राधान्य असेल असेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले. सध्या चारा मुबलक उपलब्ध असुन चारा छावण्यांची गरज नसल्याचेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट करत शासन प्रशासन टंचाईवर मात करण्यासाठी सज्ज असल्याचेही सांगितले.
अवकाळी पावसाने मध्यला काळात मराठवाड्याला झोडपले, त्यांचे पंचनामे सुरु असुन पंचनामे झाल्यानंतर मदत देण्यात येईल असेही एकनाथ शिंदे यांनी सांगितले. निवडणूक आयोगाने या कामाबाबत, दुष्काळ बाबत काम करण्याची परवानगी दिली आहे असेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले.
बी बियाणे आणि खते बाबत बोगस विकण्याचा कुणी प्रयत्न केला तर थेट त्यांना जेल मध्ये टाकणार, कठोर कारवाई होईल असा इशारा एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषदेत दिला.मुंबईतल्या होंर्डींग दुर्घटनेनंतर होर्डिंग बाबत महाराष्ट्रातील सर्व महापालिकांना, नगर परिषदांना सक्त सूचना दिल्या आहेत, विना परवानगी असलेले तात्काळ काढून टाका, आणि परवाना असलेले होर्डिंग ऑडिट करा असे सांगितले आहे.
गेल या उद्योगाबाबत विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या आरोपावर बोलताना गेलं कंपनी बाबत बघू, आरोप करायला काय लागते, वेदांता बाबत आरोप केले, त्यावेळी आमचे सरकार २ महिन्यांचे होते राज्यात ६ लाख कोटी रुपयांचे उद्योग आम्ही आणले आहेत. पुर्वीचे सरकार उद्योजकांच्या खाली बॉम्ब लावायचे आता तसे होत नाही असं प्रत्युत्तर एकनाथ शिंदे यांनी दिले.