Cellar and ancient idols found in Pandharpur temple

ताज्या बातम्या

पंढरपूर मंदिरात सापडले तळघर आणि पुरातन मुर्त्या

By admin

May 31, 2024

सोलापूर ,

Cellar and ancient idols found in Pandharpur temple पंढरपुरातील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या संवर्धनाचे काम सुरू आहे हे काम करत असताना शुक्रवारी मंदिर परिसरातच कान्होपात्रा मंदिराशेजारी सहा बाय सहा चे तळघर आढळून आले आहे. या तळघरांमध्ये तीन फूट उंचीच्या दोन व्यंकटेश्वराच्या मुर्त्या काही नाणी आढळून आली आहेत.

या घटनेचे वृत्त मिळताच पुरातन विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी त्या ठिकाणी दाखल झाले आहेत तसेच या ठिकाणावर सापडलेल्या मुर्त्या आणि काही वस्तू ताब्यात घेतली असून त्याची तपासणी चालू आहे याचा सविस्तर अहवाल शासनाला पाठविण्यात येणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे या मुर्त्या पंधराव्या किंवा सोळाव्या शतकातील असण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे तसेच पूर्वी होणाऱ्या परकीय आक्रमणामुळे मुर्त्यांची सुरक्षितता राहावी यासाठी हे तळघर बनवण्यात आले असावे असाही अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

शिक्षकांचे प्रश्न सोडविण्यासाठी माझी उमेदवारी

पुरातत्त्व विभागाचे सहाय्यक संचालक विलास वहाने आणि वास्तू विशारद तेजस्विनी आफळे हे तळघर उघडून आत गेले होते.त्यांनी भग्नमूर्ती आणि पादुका बाहेर काढल्या आहेत.

विठ्ठल मंदिराजवळील हनुमान गेटजवळ हा दरवाजा सापडला. त्यात प्रवेश केला असता काही बांगड्याचे तुकडे, तसेच काही नाणी सापडल्याचे पुरातत्व विभागाचे सहायक संचालक विलास वाहने यांनी सांगितले. या ठिकाणी मातीच्या बांगड्या, जुनी नाणी व दगडाच्या मुर्त्या सापडल्या. हे तळघर आतून बंदीस्त आहे. यावेळी मंदिर समितीचे राजेंद्र शेळके, बालाजी पुदलवाढ, शकुंतला नडगीरे आदी उपस्थित होते.