burhanagar devi trust

ताज्या बातम्या

burhanagar devi trust जिल्हा सत्र न्यायालयाचा पुजारी भगत यांना दणका. बुऱ्हानगर येथील जगदंबा तुळजापूरची देवी ट्रस्ट मंदिर गावकऱ्यांकडे सुपूर्त

By admin

November 24, 2022

जिल्हा सत्र न्यायालयाचा पुजारी भगत यांना दणका. बुऱ्हानगर येथील जगदंबा तुळजापूरची देवी ट्रस्ट मंदिर गावकऱ्यांकडे सुपूर्त

 

बुऱ्हानगर येथील जगदंबा तुळजापूरची देवी ट्रस्ट मंदिर गावकऱ्यांकडे सुपूर्त

जिल्हा सत्र न्यायालयाचा पुजारी भगत यांना दणका…

नगर

burhanagar devi trust बुऱ्हानगर येथील जगदंबा तुळजापूरची देवी ट्रस्ट मंदिर हे भाविकांचे श्रद्धास्थान आहे. राज्यभरातून या मंदिरामध्ये भाविक दर्शनासाठी येत असतात. तुळजाभवानीचे माहेरघर म्हणून या मंदिराची ओळख आहे.

burhanagar devi trust

मंदिराला धार्मिक व ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे. तरी गावकरी रामदास जाधव व नानाभाऊ तापकिरे व ग्रामस्थांनी गेल्या 41 वर्षापासून सदरचे मंदिर ट्रस्ट हे गावाकडे सुपूर्त करण्यासाठी न्यायालयीन लढा देत होते. सदरचे मंदिर हे विजय भगत व कै.अर्जुन भगत यांचे असे म्हणणे होते की सदरचे मंदिर हे आमचे खाजगी मालकीच्या आहे. या निर्णयाच्या विरोधात पुणे येथे धर्मादाय आयुक्त कार्यालयात याचिका दाखल करण्यात आली होती.

परंतु भगत कुटुंबियांच्या विरोधात निकाल देऊन मंदिर ट्रस्ट हे गावाकडे सुपूर्त करण्याचे आदेश दिले होते. परंतु त्या निर्णयाच्या विरोधात भगत कुटुंबीयांनी अहमदनगर जिल्हा सत्र न्यायालयामध्ये याचिका दाखल केली होती.

आज या याचिकेवर जिल्हा न्यायाधीश एन. आर. नाईकवाडे यांच्यासमोर युक्तिवाद पूर्ण होऊन गावकऱ्यांच्या बाजूने ऍड. सुभाष काकडे व ऍड.सागर गुंजाळ, ऍड.नरेश गुगळे यांनी युक्तिवाद करताना न्यायालयाला असे निदर्शनास आणून दिले की, हे मंदिर भगत कुटुंबीयांचे नसून गावकऱ्यांचे आहे. सदर बाबीचे पुरावे त्यांनी सादर केले. आणि  न्यायालयाने गावकऱ्यांच्या बाजूने आज निकाल दिला.

सुमारे 41 वर्षानंतर हा निर्णय जाहीर झाला सदरचे मंदिर आता गावकऱ्यांकडे सुपूर्त करण्याचा आदेश न्यायालयाने दिला आहे अशी माहिती गावकऱ्यांचे वकील ऍड. सुभाष काकडे यांनी दिली.