ताज्या बातम्या

Buldhana news बुलडाणा जिल्ह्यात मधमाश्यांच्या हल्ल्यात शेतकरी ठार

By admin

February 19, 2023

बुलडाणा जिल्ह्यात मधमाश्यांच्या हल्ल्यात शेतकरी ठार

खामगाव जवळील घटना ,अग्निशामक दलाची मदत

बुलडाणा

Buldhana news जिल्ह्यातील  खामगाव -चिखली रोडवर दुचाकीने जात असताना गारडगाव नजीक खामगाव तालुक्यातील अत्रंज येथील जगन्नाथ नामदेव देवळे या शेतकऱ्यावर आज १९ फेब्रुवारी रोजी सकाळी १० वा च्या सुमारास आग्या मोहोळ (मधमाश्या)ने कडाडून चावा घेतला.

एवढ्या मोठ्या प्रमाणात मधमाश्या चावल्या कि घडलेल्या घटनेत शेतकरी गंभीररीत्या जखमी झाला होता मात्र उपस्थित नागरिकांना कुणालाही जवळ जाता आले नाही.

त्यामुळे खामगाव येथून अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आल्यानंतर मधमाश्या बाजूला करता घटनेनंतर गंभीर अवस्थेतील शेतकऱ्याला खामगाव येथील शासकीय सामान्य रुग्णालयात दाखल केल्यानंतर त्या शेतकऱ्याचा मूत्यू झाला.

घटनास्थळी आमदार आकाश फुंडकर भेट दिली तहसीलदार पाटोळे यांनीही रुग्णालयात जाऊन घटनेची माहिती घेतली.